कवठा धरणाला पडले भगदाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:32 AM2017-10-07T02:32:49+5:302017-10-07T02:33:02+5:30

अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा शेलू येथील धरणाच्या बांधकामात निकृष्ट मुरू म, साहित्य वापरल्यामुळे या धरणांच्या भिंतींना भगदाड पडले आहे. जवळपास दोन ते आठ कोटी रुपये खर्च झालेले हे निकृष्ट काम पुन्हा करण्यासाठीचा प्रस्ताव लघू पाटबंधारे विभागाने तयार केल्याचे वृत्त आहे. असे केले तर अगोदर झालेला या धरणाच्या बांधकामावरील खर्च कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Cavalcade broke the gap! | कवठा धरणाला पडले भगदाड!

कवठा धरणाला पडले भगदाड!

Next
ठळक मुद्देनव्याने काम करणारअगोदरच्या खर्चाचे काय!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा शेलू येथील धरणाच्या बांधकामात निकृष्ट मुरू म, साहित्य वापरल्यामुळे या धरणांच्या भिंतींना भगदाड पडले आहे. जवळपास दोन ते आठ कोटी रुपये खर्च झालेले हे निकृष्ट काम पुन्हा करण्यासाठीचा प्रस्ताव लघू पाटबंधारे विभागाने तयार केल्याचे वृत्त आहे. असे केले तर अगोदर झालेला या धरणाच्या बांधकामावरील खर्च कोण देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील कवठा शेलू येथे ११ कोटी रुपये खचरून हे धरण बांधण्यात येत आहे. २७४ हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या धरणाचे काम २00९ मध्ये सुरू  करण्यात आले होते. धरणाचे भूमिगत ड्रेन व रॉपटेज म्हणजेच दगडाचे बांधकाम झाले आहे. दोन वर्षांपासून धरणाचे काम बंद पडले आहे. अगोदर धरणाच्या बांधकामावर आठ कोटींवर खर्च झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने धरणाचे नव्याने बांधकाम करण्यासाठी नाशिक येथील मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेकडे डिझाइनसाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचे वृत्त आहे. या भागातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे; पण मागील आठ वर्षांपासून या धरणाच्या कामाला विलंब होत आहे. सुरुवातीला मूर्तिजापूर तालुक्यातील ८४ गावे कारंजा मतदारसंघात होती, त्यावेळी या धरणाचे काम वाशिम जिल्हय़ांतर्गत करण्यात आले. नंतर ही गावे मूर्तिजापूर मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली आहेत. आता या धरणाचे काम अकोला विभागाकडे आले आहे. या धरणाचे काम तातडीने व्हावे, यासाठी या भागातील लोकप्रतिनिधीचा रेटा वाढला आहे. 

कवठा शेलू धरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. धरणाच्या बांधकामासाठी निकृष्ट साहित्य वापरल्याने भेगा पडल्या आहेत. यासंदर्भात आपण पाठपुरावा केला आहे. विधानसभेत लक्षवेधी केली आहे. या भागात धरण होऊन शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठीचे प्रयत्न आहे. त्यासाठी नव्याने प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
- हरीश पिंपळे, 
आमदार, मूर्तिजापूर.

Web Title: Cavalcade broke the gap!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.