राष्ट्रीय महामार्गावर वाशिंब्याजवळ बसचा अपघात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 08:52 PM2017-11-08T20:52:24+5:302017-11-08T20:59:11+5:30

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्द येणा-या राष्ट्रीय महामार्गावर ८ नोव्हेंबर रोजी सकाळी वाशिंब्यानजीक ट्रक व राज्य परिवहन महामंडळ व बसचा अपघात झाला. या अपघातात बसचालक जखमी झाला.

Bus accidents near the Washimba - borgaonmanju on the National Highway! | राष्ट्रीय महामार्गावर वाशिंब्याजवळ बसचा अपघात!

राष्ट्रीय महामार्गावर वाशिंब्याजवळ बसचा अपघात!

Next
ठळक मुद्देट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने बस ट्रकवर धडकलीबसचालक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्द येणा-या राष्ट्रीय महामार्गावर ८ नोव्हेंबर रोजी सकाळी वाशिंब्यानजीक ट्रक व राज्य परिवहन महामंडळ  बसचा अपघात झाला. या अपघातात बसचालक जखमी झाला.


कारंजा आगाराची बस क्रमांक एमएच ४० वाय ५३२९ बस बुधवारी प्रवाशांची वाहतूक करीत असताना तिच्यासमोर एमपी २० एचबी ६९८४ क्रमांकाचा माल वाहतूक ट्रक धावत होता. समोरील ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबून वेग कमी केल्याने पाठीमागून धावणारी बस ट्रकवर धडकली. यावेळी बसचालकाने बसचा वेग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला; परंतु चालकाच्या साइडने बस ट्रकच्या मागच्या भागावर धडकली. या अपघातात बसचे नुकसान झाले, तसेच बसचालक तोटे जखमी झाले. या घटनेनंतर सदर ट्रक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना मिळताच हे.काँ. दीपक कानडे, भागवत कांबळे यांनी घटना ठिकाणावर जाऊन पंचनामा केला व जखमी चालकास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, काही काळ महामार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली होती. पुढील तपास ठाणेदार पी. के. काटकर यांच्यासह पोलीस कर्मचारी करीत आहेत. 

Web Title: Bus accidents near the Washimba - borgaonmanju on the National Highway!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.