लग्नापूर्वी भगत दाम्पत्यांनी घोटा गावात शोष खोदून केले श्रमदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 09:44 AM2018-02-08T09:44:49+5:302018-02-08T09:45:07+5:30

पाणी प्रश्नाची समस्या निकाली काढण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता ४ फेब्रुवारी फुलचंद भगत व प्रज्ञा तायडे यांनी विवाहापूर्वी शोषखड्डे खोदण्याच्या कामास श्रमदान करून हा कार्यक्रम पार पडला.

bhagat families initiative for pani foundations activity | लग्नापूर्वी भगत दाम्पत्यांनी घोटा गावात शोष खोदून केले श्रमदान 

लग्नापूर्वी भगत दाम्पत्यांनी घोटा गावात शोष खोदून केले श्रमदान 

googlenewsNext

मंगरूळपीर (जि.वाशिम) - पाणी प्रश्नाची समस्या निकाली काढण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता ४ फेब्रुवारी फुलचंद भगत व प्रज्ञा तायडे यांनी विवाहापूर्वी शोषखड्डे खोदण्याच्या कामास श्रमदान करून हा कार्यक्रम पार पडला.

तालुक्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनासोबतच ग्रामस्थांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. या जलसंधारणाच्या कामाला गती व लोकांना प्रेरणा मिळावी, याकरिता सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत आणि प्रज्ञा तायडे यांच्या नियोजित विवाहापूर्वी श्रमदान करण्याचा संकल्प केला असून, वॉटर कप स्पर्धेमध्ये प्रथमत: सहभागी झालेले घोटा गावचे सरपंच नंदूभाऊ गावंडे यांनी पुढाकार घेतला आहे. पाणी टंचाईवर मात व गाव स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे शोषखड्डा त्यालाच म्हणतो. आपण मॅजिकपीठ हे शोषखड्डे प्रत्येक कुटुंबाच्या घरासमोर व्हावे, त्याचा प्रचार, प्रसार व्हावा, या हेतूने मंगरूळपीर तालुक्यातील पोघात ग्राम पंचायतच्यावतीने घोटा गाव शोषखड्डेमुक्त व्हावे, या हेतूने तसेच तालुक्यात पाणी फाउंडेशनकडून सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत प्रत्येक गाव शोषखड्डेमुक्त व्हावे, या हेतूने मंगरूळपीर येथील सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांचा विवाह सोहळा ४ फेब्रुवारी रोजी पार पडला.  या कामातून पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. 

पाणी फाउंडेशनकडून राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेकरिता मंगरूळपीर तालुक्याची निवड करण्यात आली. स्पर्धेच्या दुष्टीने प्रत्येक गाव शोषखड्डेमुक्त होऊन गाव दुष्काळमुक्त होण्यासाठी हा शोषखड्ड्याचा प्रचार अन् प्रसार होण्यासाठी पाणी फाउंडेशनकडून गावागावात शोषखड्ड्याची फिल्म दाखविल्या जात आहे. या फिल्मची प्रेरणा घेऊन स्पर्धेत सहभागी असलेल्या घोटा गावात शोष खड्डे करण्याचा निर्णय घोटा येथील सरपंच नंदुभाऊ गावंडे यांनी घेतला. त्यानुसार आज ३५ खड्ड्यास प्रारंभ करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार कुलकर्णी, पुणे कुषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठलराव गावंडे यांच्यासह पत्रकार व तालुका समन्वयक प्रफुल्ल बानगावकर व देवेंद्र राऊत, नाना देवळे मंडळींची उपस्थिती होती.
 

Web Title: bhagat families initiative for pani foundations activity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.