बहिणाबाईंनी बजावला मतदानाचा हक्क, अकोला लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ, दिव्यांगांच्या गृह मतदानाला प्रारंभ  

By रवी दामोदर | Published: April 13, 2024 06:11 PM2024-04-13T18:11:45+5:302024-04-13T18:12:07+5:30

...या अंतर्गत रिसोड तालुक्यातील करडा येथील बहिणाबाई बाजीराव देशमुख या आजीबाईंनी पहिला मतदानाचा हक्क बजावला आहे. 

Bahinabai exercised her right to vote, home voting for senior citizens and disabled people started in Akola Lok Sabha constituency | बहिणाबाईंनी बजावला मतदानाचा हक्क, अकोला लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ, दिव्यांगांच्या गृह मतदानाला प्रारंभ  

बहिणाबाईंनी बजावला मतदानाचा हक्क, अकोला लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ, दिव्यांगांच्या गृह मतदानाला प्रारंभ  

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघातील ७२६ दिव्यांग व ८५ वर्षांपुढील १ हजार ६३२ मतदार अशा एकूण २ हजार ३५८ मतदारांना गृह मतदानाची सुविधा देण्यात आली असून, त्याचा प्रारंभ शनिवार, दि. १३ एप्रिलपासून झाला आहे. या अंतर्गत रिसोड तालुक्यातील करडा येथील बहिणाबाई बाजीराव देशमुख या आजीबाईंनी पहिला मतदानाचा हक्क बजावला आहे. 

अकोला लोकसभा मतदारसंघातील गृह मतदानाची सुरूवात रिसोड तालुक्यातून झाली. गृह मतदानासाठी प्राप्त विकल्पानुसार मतदार निश्चित करण्यात आले असून, स्वतंत्र मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहे. ही मतदान पथके मतदाराच्या घरी पोहोचून त्यांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. या सुविधेमुळे दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

या तारखांना होणार मतदानासाठी गृहभेटी
रिसोड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानासाठी  गृह भेटीचा दि.१३ व १५ एप्रिल आहे किंवा आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीचा दि.१८ एप्रिल असा आहे. अकोट विधानसभा मतदारसंघ, तसेच अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दि.१८ व १९ एप्रिल किंवा आवश्यकता वाटल्यास २२ एप्रिल असा आहे. बाळापूर मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दि. १५ व १६ एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास १९ एप्रिल असा आहे. अकोला पूर्व मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दि. १५ व १६ एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीचा दि. २० व २१ एप्रिल असा आहे. मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दि.१८ व १९ एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीचा दि. २१ व २१ एप्रिल असा आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील सर्व दिव्यांग व ८५ वर्षांपुढील मतदारांनी नमूद दिनांकास घरी राहून निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

गृह मतदानासाठी दिव्यांग व वृद्ध मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मतदान यंत्रणा घरी येण्याच्या तारखा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. या तारखांना घरी उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावावा
- अजित कुंभार, निवडणूक निर्णय अधिकारी.
 

Web Title: Bahinabai exercised her right to vote, home voting for senior citizens and disabled people started in Akola Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.