श्री सूर्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध आणखी एक गुन्हा; ४२ लाखांनी केली अकोल्यातील महिलेची फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:54 PM2017-12-26T22:54:31+5:302017-12-26T22:56:54+5:30

अकोला: श्री सूर्या फायनान्स कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना विविध प्रकारचे आमिष देऊन  त्यांची लाखो रुपयांची रक्कम गुंतवणूक करून फसवणूक करणार्‍या श्री सूर्या कंपनीच्या  संचालकांविरुद्ध खदान पोलिसांनी मंगळवारी दुपारी गुन्हे दाखल केले आहेत. या कंपनीने तब्बल  ४२ लाख रुपयांनी गुंतवणूकदारांना गंडा घातला असून, न्यायालयाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Another crime against the director of Surya Company; 42 lakhs of women in Akola! | श्री सूर्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध आणखी एक गुन्हा; ४२ लाखांनी केली अकोल्यातील महिलेची फसवणूक!

श्री सूर्या कंपनीच्या संचालकांविरुद्ध आणखी एक गुन्हा; ४२ लाखांनी केली अकोल्यातील महिलेची फसवणूक!

Next
ठळक मुद्देन्यायालयाच्या आदेशाने फौजदारी दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: श्री सूर्या फायनान्स कंपनीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना विविध प्रकारचे आमिष देऊन  त्यांची लाखो रुपयांची रक्कम गुंतवणूक करून फसवणूक करणार्‍या श्री सूर्या कंपनीच्या  संचालकांविरुद्ध खदान पोलिसांनी मंगळवारी दुपारी गुन्हे दाखल केले आहेत. या कंपनीने तब्बल  ४२ लाख रुपयांनी गुंतवणूकदारांना गंडा घातला असून, न्यायालयाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री सूर्या कंपनीचे संचालक समीर सुधीर जोशी (४५), पल्लवी समीर जोशी (४९) दोघेही  राहणार हरदेव हॉटेलजवळ,  सीताबर्डी, नागपूर, मोहन मुकुंद पितळे (४५), मंगेश मोहन पितळे  (४0), मुकुंद अंबादास पितळे (७0), रा. फश्री टॉपजवळ, नरहरी मंगल कार्यालय, दीप नगर, नं.  २, अमरावती यांनी श्री सूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचे एजंट असल्याचे सांगत अकोल्यातील गोरक्षण  रोडवरील रमाई अपार्टमेंट येथील रहिवासी  मीरा दीपक आखरे (५१) यांना श्री सूर्या इन्व्हेस्टमेंट  कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करून मुदत ठेवी व इतर ठेवी स्वीकारून त्या मोबदल्यात आकर्षक व्याज  देण्याचे आमिष दिले. या आमिषाला बळी पडत आखरे यांनी तब्बल २१ लाख ३५ हजार रुपयांची  गुंतवणूक श्री सूर्या कंपनीत केली. ही गुंतवणूक करण्याआधी पितळे याने आर्थिक उलाढालीची व  उच्च नफा दर्शविणारी विवरण पत्रे, ऑडिट पेपर मीरा आखरे यांना दाखविली. ही विवरणपत्रे बघून  आखरे यांना सदर कंपनीवर विश्‍वास बसला;  मात्र गुंतविलेली ४२ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम  परत मागितली असता पितळे याने हात वर केले. मीरा आखरे यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेच्या  मोबदल्यात त्यांना तब्बल ३४ लाख ८0 हजार ९00 रुपये एवढी परतफेड मिळणार होती. यासह  आणखी रक्कम मिळून ही रक्कम तब्बल ४२ लाख रुपयांपर्यंत होती. सदर ४२ लाख रुपयांच्या रकमे पैकी श्री सूर्या कंपनीकडून एकही छदाम न मिळाल्यामुळे मीरा आखरे यांनी खदान पोलीस ठाण्यात  तक्रार केली. पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले; मात्र त्यांनी न्यायालयात धाव घेतली.  न्यायालयाच्या आदेशानंतर खदान पोलीस ठाण्यात फसवणूक करणे, संगनमत करून कटकारस् थान रचणे यासह आमिष दाखविणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Another crime against the director of Surya Company; 42 lakhs of women in Akola!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.