अकोल्याच्या  पालकमंत्र्यांनी केली ‘सर्वोपचार’ची पाहणी; रुग्णांच्या समस्या घेतल्या जाणून

By Atul.jaiswal | Published: February 12, 2018 06:42 PM2018-02-12T18:42:03+5:302018-02-12T18:50:03+5:30

अकोला : अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी येथील   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयाला  भेट देवून वेगवेगळया वॉर्डची  पाहणी केली.

Akola's Guardian Minister visit to hospital | अकोल्याच्या  पालकमंत्र्यांनी केली ‘सर्वोपचार’ची पाहणी; रुग्णांच्या समस्या घेतल्या जाणून

अकोल्याच्या  पालकमंत्र्यांनी केली ‘सर्वोपचार’ची पाहणी; रुग्णांच्या समस्या घेतल्या जाणून

googlenewsNext
ठळक मुद्देशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयाला  भेट देवून वेगवेगळया वॉर्डची  पाहणी केली. रूग्णालयातील स्वच्छता,  डॉक्टर व कर्मचाऱ्यांची  उपस्थिती याबाबत त्यांनी माहिती जाणून घेत प्रत्यक्ष पाहणी केली.  या ठिकाणी आयोजित जनता आरोग्य दरबारात त्यांनी रुग्णांच्या तक्रारी जाणून घेतल्या.

अकोला : अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी येथील   शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयाला  भेट देवून वेगवेगळया वॉर्डची  पाहणी केली. तसेच  रूग्णांची विचारपूस करुन त्यांच्या समस्या व अडचणी  जाणून घेतल्या. रूग्णालयातील स्वच्छता,  डॉक्टर व कर्मचाऱ्यांची  उपस्थिती याबाबत त्यांनी माहिती जाणून घेत प्रत्यक्ष पाहणी केली.  रूग्णांना उत्तम आरोग्य सेवा पुरविण्याबरोबरच  रूग्णालयातील सुविधांबाबत वैद्यकीय  अधिकाºयांनी  सजग राहावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. तत्पुर्वी, या ठिकाणी आयोजित जनता आरोग्य दरबारात त्यांनी रुग्णांच्या तक्रारी जाणून घेतल्या.
          शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयात सोमवारी आयोजीत जनता आरोग्य दरबारच्या निमित्याने पालकमंत्र्यांनी रूग्णालयाची पाहणी केली.  यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौहान, प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख हे उपस्थित होते. प्रारंभी रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६  व ७ मध्ये जावून त्यांनी  रूग्णांची भेट घेतली.  त्यांची सहानुभूतीने विचारपूस करुन त्यांना मिळणाºया आरोग्यसेवेबाबत चौकशी केली. कर्तव्यावर असणारे  डॉक्टर, पारिचारीका व इतर  कर्मचारी यांचीही चौकशी करून  रूग्णांना चांगल्या प्रकारच्या  आरोग्य सुविधा देण्याबरोबरच वॉर्ड व स्वच्छतागृह  स्वच्छ ठेवण्याचे  निर्देश दिले. या  कामांमध्ये दिरंगाई खपवून  घेतली जाणार नाही, अशी तंबी पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. रूग्णालयाच्या परिसरात  सूरू असलेल्या विविध बांधकामांचाही  त्यांनी  याप्रसंगी  आढावा घेतला.  सिटी स्कॅन विभागालाही त्यांनी भेट दिली. 

गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश
           यानंतर पालकमंत्र्यांनी स्टोअर रूम, डॉक्टर रूम आणि  विभागप्रमुखांच्या रूमला भेट देवून गैरहजर  असणाऱ्या  डॉक्टर व कर्मचाऱ्यांची  माहिती जाणून घेतली.   विनापरवानगी गैरहजर असणाऱ्यांना  नोटीस  देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आरोग्य जनता दरबारात दोन तक्रारी
          दरम्यान आज झालेल्या जनता  आरोग्य  दरबारात दोन तक्रारी  प्राप्त  झाल्या. प्राप्त तक्रारींचे तातडीने निराकरण  करण्याची  सूचना त्यांनी  संबंधीत अधिका-यांना  केली. यावेळी डॉ. कार्यकर्ते  यांनी महाविदयालय व रूग्णालयाबाबतच्या अडचणी मांडल्या. रुग्णालयात परिचारीका व कर्मचाºयांची  पदभरती, सुपरस्पेशालिटी रूग्णालयात नवीन पदांची निर्मिती याबाबतची माहिती त्यांनी पालकमंत्र्यांना दिली. पदनिर्मितीबाबत लवकरच वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या समवेत  बैठक  घेतली जाईल.  असे यावेळी  पालकमंत्र्यांनी  सांगितले. 

Web Title: Akola's Guardian Minister visit to hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.