अकोला : ट्रक उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 12:11 PM2017-11-07T12:11:19+5:302017-11-07T12:12:39+5:30

सिमेट घेऊन जाणारा ट्रक उलटल्यानं त्याखाली 6 मजूर दबले गेले. यातील एकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर झाले आहेत.

Akola: One killed, 5 others seriously injured in truck collision | अकोला : ट्रक उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी  

अकोला : ट्रक उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी  

googlenewsNext

अकोला - सिमेट घेऊन जाणारा ट्रक उलटल्यानं त्याखाली 6 मजूर दबले गेले. यातील एकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील बाभूळगाव जहाँगीर परिसरातील नवोदय विद्यालयासमोर ही दुर्घटना घडली आहे. मंगळवारी ( 7 नोव्हेंबर ) सकाळी ही घटना घडली आहे. मृत व्यक्तीचं नाव सलमान खान अय्युब खान (वय 26 वर्ष ) असे आहे. तर शे माहेबुब शे कालु ( वय 40 वर्ष), बब्बु खान (वय 45 वर्ष), शे असिफ शे रउफ ( वय 29 वर्ष ), शे नशीब शे खालीब आणि जयमाला सोनोने अशी जखमींची नावं आहेत. 

ही सर्व मंडळी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीमध्ये बाईकनं कामावर जात होते. यावेळी अमरावतीच्या दिशेनं सिमेंट घेऊन जाणा-या ट्रक चालकाने समोरच्या वाहनाला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला व त्याखाली हे मजूर चिरडले गेले.

Web Title: Akola: One killed, 5 others seriously injured in truck collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात