अकोला महापालिकेचा लाचखोर आरोग्य निरीक्षक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 02:19 AM2018-02-14T02:19:30+5:302018-02-14T02:19:43+5:30

अकोला : महापालिकेतील एका कर्मचार्‍याला हजेरी प्रमाणपत्र देण्यासाठी सुमारे ४ हजार रुपयांची लाच मागणार्‍या महापालिकेचा आरोग्य निरीक्षक सुरेश रामराव पुंड याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले व पथकाने रंगेहात अटक केली. मंगळवारी सायंकाळी हा सापळा रचून यशस्वी कारवाई करण्यात आल्याने महापालिके तील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Akola Municipal Corporation's Bribery Health Inspector Jeraband | अकोला महापालिकेचा लाचखोर आरोग्य निरीक्षक जेरबंद

अकोला महापालिकेचा लाचखोर आरोग्य निरीक्षक जेरबंद

Next
ठळक मुद्दे‘एसीबी’ची मोठी कारवाई; हजेरी प्रमाणपत्र देण्यासाठी घेतली लाच

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेतील एका कर्मचार्‍याला हजेरी प्रमाणपत्र देण्यासाठी सुमारे ४ हजार रुपयांची लाच मागणार्‍या महापालिकेचा आरोग्य निरीक्षक सुरेश रामराव पुंड याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले व पथकाने रंगेहात अटक केली. मंगळवारी सायंकाळी हा सापळा रचून यशस्वी कारवाई करण्यात आल्याने महापालिके तील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
महापालिकेच्या एका ३२ वर्षीय कर्मचार्‍याला वेतन मिळण्यासाठी हजेरी प्रमाणपत्राची आवश्यकता होती. हे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार असलेला आरोग्य निरीक्षक सुरेश रामराव पुंड (४९) रा. निबंधे प्लॉट, लहान उमरी याने कर्मचार्‍यास हजेरी पत्रक देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच मागितली; मात्र तक्रारकर्त्याला लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार १२ फेब्रुवारी रोजी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. यावरून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमुख संजय गोर्ले यांनी १२ फेब्रुवारीला पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यामध्ये आरोग्य निरीक्षक सुरेश पुंड याने लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर तक्रारकर्त्यासोबत रक्कम देण्यासाठी १३ फेब्रुवारी मंगळवार दिवस ठरला. 
मंगळवारी सायंकाळी सुरेश पुंड याने लाच स्वीकारताच सापळा रचून असलेले एसीबीचे प्रमुख संजय गोर्ले व पथकाने लाचखोर पुंडला लाच घेताना रंगेहात अटक केली. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता नाशिककर यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक संजय गोर्ले, संतोष, सुनील राऊत व इंगळे यांनी केली.

Web Title: Akola Municipal Corporation's Bribery Health Inspector Jeraband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.