अकोल्यातील अलंकार मार्केटजवळ २७ लाखांची रोकड पकडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 02:38 AM2017-12-06T02:38:09+5:302017-12-06T02:40:55+5:30

एका युवकाच्या बॅगमध्ये हवालाचे लाखो रुपये असल्याच्या माहितीवरून स्थानिक  गुन्हे शाखेने छापा घालून २७ लाख ५४ हजार ४३0 रुपयांची रोकड मंगळवारी रात्री अलंकार  मार्केटजवळून जप्त केली. स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाला पलकभाई रमनभाई पटेल (२६, रा. रणपिसे नगर) हा लाखो  रुपयांची रोकड घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.

Akola market, cash worth Rs 27 lakh was caught! | अकोल्यातील अलंकार मार्केटजवळ २७ लाखांची रोकड पकडली!

अकोल्यातील अलंकार मार्केटजवळ २७ लाखांची रोकड पकडली!

googlenewsNext
ठळक मुद्देएका युवकाच्या बॅगमध्ये हवालाचे लाखो रुपये असल्याची माहितीमिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने छापा घातला व रोकड जप्त केली

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : एका युवकाच्या बॅगमध्ये हवालाचे लाखो रुपये असल्याच्या माहितीवरून स्थानिक  गुन्हे शाखेने छापा घालून २७ लाख ५४ हजार ४३0 रुपयांची रोकड मंगळवारी रात्री अलंकार  मार्केटजवळून जप्त केली. स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाला पलकभाई रमनभाई पटेल (२६, रा. रणपिसे नगर) हा लाखो  रुपयांची रोकड घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक  चंद्रकांत ममताबादे, अशोक चाटी, शेख हसन, अब्दुल माजीद, एजाज अहमद, रवी इरचे यांनी  दुचाकीवरून जाणार्‍या पलकभाई पटेल याला अलंकार मार्केटजवळ पकडले. त्याच्याकडील  बॅगेची तपासणी घेतली असता, त्यात लाखो रुपयांची रोकड आढळून आली. त्याला स्थानिक  गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले होते. तेथे त्याच्याकडून रक्कम जप्त केली असून,  त्या रकमेची मोजणी करण्यात आली. पलकभाई पटेलने दिलेल्या माहितीवरून त्याच्याकडे २७  लाख ५४ हजार ४३0 रुपये असल्याचे समोर आले आहे. या रकमेमध्ये दोन हजार, पाचशे  आणि शंभर रुपयांच्या नोटांचे बंडल आहेत. ही रक्कम कशाची आहे, याचे कागदपत्र तो  पोलिसांसमोर दाखवू शकला नाही. त्यामुळे ही रक्कम हवालाची असल्याचा पोलिसांना संशय  आहे. पोलिसांनी पलकभाई पटेल याला ताब्यात घेतले. आयकर विभागाकडून रकमेबाबत  चोकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिसांच्या तपासाची दिशा ठरेल.

Web Title: Akola market, cash worth Rs 27 lakh was caught!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.