अकोला जिल्ह्यातील कुटासा येथील शेतकरी धडकले आकोटच्या कृषी अधिकारी कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 06:25 PM2017-12-12T18:25:51+5:302017-12-12T18:29:18+5:30

चोहोट्टा बाजार : कुटासा परिसरातील गावामधील पिकांचे सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे कपिल ढोके यांच्यासह शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना  निवेदन दिले.

Akola :Farmers give memorandum to agriculture officer | अकोला जिल्ह्यातील कुटासा येथील शेतकरी धडकले आकोटच्या कृषी अधिकारी कार्यालयावर

अकोला जिल्ह्यातील कुटासा येथील शेतकरी धडकले आकोटच्या कृषी अधिकारी कार्यालयावर

Next
ठळक मुद्देबोंडअळीने नुकसान झालेल्या कपाशीचा सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी.कृषी अधिकाऱ्यांना सोपविले मागण्यांचे निवेदन.

चोहोट्टा बाजार : कुटासा सर्कलअंतर्गत येणाºया सर्वच गावांमध्ये कपाशी या नगदी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आला असून हाती आलेले नगदी पिकही खराब होताना दिसून येत आहे. बोंडअळीच्या अस्मानी संकआमुळे शेतकरी पुरता निराशेत सापडला आहे तरी कुटासा परिसरातील गावामधील पिकांचे सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे कपिल ढोके यांच्यासह शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना  निवेदन दिले.
कुटासा परिसरातील रोहणखेड, तरोडा, मरोडा, कावसा, कुटासा, दिनोडा, गरसोळी, पातोंडा, रेल, धारेल, गिरजापूर, करतवाडी, जऊळखेड, दनोरी, पनोरी आदी गावामध्ये कपाशीचा पेरा जास्त प्रमाणात आहे. अचानक आलेल्या बोंडअळीमुळे कपाशीतून कापूस किडलेल्या अवस्थेत पिवळा झालेला व अर्धा कापूस नष्ट झालेला अशा प्रकारचा कापूस येत आहे तरी शासनाने कुटासा परिसरातील सर्वच गावामध्ये सर्व्हे व पिकाचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी अकोला जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे कपिल ढोके, सेवा सहकारी सोसायटी सभापती राजू पाटील झटाले, अमोल काळणे, प्रतापराव गावंडे, श्रीकृष्ण गावंडे, पद्माकर जायले, दत्ता साबळे, रवी वानखडे, अंकुर गावंडे, संजय मालवे, मंगेश केवट, मिलिंद झामरे, प्रशांत भगत, अजय रेलकर, श्याम चतार, भूषण झामरे, वैभव झामरे, अर्जुन मालाणी, शुभम थोरात, विठ्ठल सदाफळे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षºया आहेत. (वार्ताहर)

- बोंडअळीमुळे शेतकऱ्यांना  मोठा फटका बसत आहे. कपाशीमध्ये ७५ टक्के बोंड सडलेल्या अवस्थेत आहेत. कपाशीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना प्रतिएकर ५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.
- कपील ढोके,
संभाजी ब्रिगेड.

Web Title: Akola :Farmers give memorandum to agriculture officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.