अकोला : पूर्व वैमनस्यातून दोन गटात झालेल्या सशस्त्र हल्लय़ात युवकाची हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 06:23 PM2017-12-14T18:23:40+5:302017-12-14T20:27:22+5:30

पूर्व वैमनस्यातून एका गटाने दुसर्‍या गटावर सशस्त्र हल्ला चढविल्याची घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास शिवसेना वसाहतीमध्ये घडली. या सशस्त्र हल्ल्यात एका गटातील युवकाचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले. याप्रकरणात जुने शहर पोलिसांनी दोन्ही गटाविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी १४ जणांना अटक केली. 

Akola: Eunuch killed in armed robbery in East Zone! | अकोला : पूर्व वैमनस्यातून दोन गटात झालेल्या सशस्त्र हल्लय़ात युवकाची हत्या!

अकोला : पूर्व वैमनस्यातून दोन गटात झालेल्या सशस्त्र हल्लय़ात युवकाची हत्या!

Next
ठळक मुद्देशिवसेना वसाहतमधील घटना१४ जणांना अटक

लोकमत न्यूज नेवटर्क
अकोला: पूर्व वैमनस्यातून एका गटाने दुसर्‍या गटावर सशस्त्र हल्ला चढविल्याची घटना बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास शिवसेना वसाहतीमध्ये घडली. या सशस्त्र हल्ल्यात एका गटातील युवकाचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले. याप्रकरणात जुने शहर पोलिसांनी दोन्ही गटाविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी १४ जणांना अटक केली. 
शहरातील शिवसेना वसाहत राहणार्‍या तुषार नागलकर याच्या घरी बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास दारूच्या नशेत धुंद असलेले शैलेश अढाऊ, अश्‍विन नवले, सागर पुरणे, राहुल खडसान यांच्यासह आणखी काही युवक गेले. याठिकाणी त्यांनी तुषार नागलकर याला घराबाहेर बोलावून अश्लील शिवीगाळ केली. वाद वाढत गेल्याने, नागलकर याच्या गटाने विरोधी गटावर सशस्त्र हल्ला चढविला. शैलेश अढाऊ याच्यावर लोखंडी कोयत्याने वार केल्यावर तो जागीच रक्ताच्या थारोळय़ात कोसळला. हे पाहताच, या गटातील युवक पळायला लागले. परंतु नागलकर गटाने या युवकांवर जोरदार सशस्त्र हल्ला चढविला. यात अश्‍विन नवले, सागर पुरणे, राहुल खडसान हे गंभीर जखमी झाले. दुसर्‍या गटातील तुषार नागलकर हा सुद्धा जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच, जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन पडघन हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी भेट दिली. दोन्ही गटांनी परस्परांविरूद्ध दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी नागलकर गटाविरूद्ध भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल केला तर दुसर्‍या गटांतील युवकांविरूद्ध ३0७, ३२४, ५0४, १४३(३४) नुसार गुन दाखल केला. पोलिसांनी गुरूवारी दुपारपर्यंत १४ जणांना अटक केली आहे. 
 

या वादातून हल्ला
शिवसेना वसाहतीजवळच अग्रवाल नामक इसमाचा प्लॉट आहे. या प्लॉटवर काही गुंड प्रवृत्तीचे लोक अतिक्रमण करायचे. नंतर हे अतिक्रमण हटविण्यासाठी अग्रवालसोबत सेटलमेंट करायचे. नागलकर गटाने या प्लॉटवर काही लाकडी साहित्य ठेवलेले होते. याचा जाब विचारण्यासाठी शैलेश अढाऊ, अश्‍विन नवले आणि काही युवक तुषार नागलकरच्या घरी गेले होते. याठिकाणी त्यांनी नागलकरला अश्लील शिवीगाळ केली आणि त्याच्या घरातील दरवाजावर लाथा सुद्धा मारल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. यातूनच नागलकर गटातून त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढविला. 

दोन्ही गटातील आरोपींना अटक 
राहुल खडसान याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सचिन नागलकर, अक्षय नागलकर, तुषार नागलकर, शुभम नागलकर, अमर भगत यांच्यासह आणखी तीन जणांविरूद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३0७ आणि ३0२ आणि आर्म अँक्ट ४, २५ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींना अटक करून दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 
दुसर्‍या गटातर्फे तुषार दिलीप नागलकर याच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सागर पुर्णये, अश्‍विन नवले, शैलेश अढाऊ, राहुल खडसान, मंगेश गंगाराम टापरे, आशिष शिवकुमार वानखडे, किशोर सुधाकर वानखडे यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३0७, ३२४, २९४, १४३, १४७, १४८, १४९ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

Web Title: Akola: Eunuch killed in armed robbery in East Zone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.