अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पिकांसाठी वापरणार सांडपाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 01:49 AM2018-01-10T01:49:26+5:302018-01-10T01:50:35+5:30

अकोला : यावर्षी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधन जगविण्यासाठी शहरातील सांडपाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच महापालिकेला देण्यात येणार आहे. सांडपाणी शुद्धीक रण प्रकल्पासाठी कृषी विद्यापीठ प्रशासन महापालिकेला पाच एकर जागा देणार असल्याचे वृत्त आहे.

Akola: Dr. Punjababrao Deshmukh Agricultural University will use wastewater for crops! | अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पिकांसाठी वापरणार सांडपाणी!

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ पिकांसाठी वापरणार सांडपाणी!

Next
ठळक मुद्देतीव्र टंचाई पाण्यावर करणार प्रक्रिया; प्रस्ताव तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यावर्षी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधन जगविण्यासाठी शहरातील सांडपाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच महापालिकेला देण्यात येणार आहे. सांडपाणी शुद्धीक रण प्रकल्पासाठी कृषी विद्यापीठ प्रशासन महापालिकेला पाच एकर जागा देणार असल्याचे वृत्त आहे.
यावर्षी पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. धरणातील जेमतेम पाण्याचा पिण्यासाठी प्राधान्यक्रम असल्याने हिवाळी, उन्हाळी पिकांनाही पाणी मिळणार नसल्याचे पाटबंधारे विभागाने जाहीर केले. तीव्र टंचाई निर्माण झाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची संशोधन जगविण्याची धडपड सुरू  आहे. कृषी विद्यापीठाकडे जवळपास पाच हजार एकराच्यावर शेतजमीन आहे. यात मुख्य बीजोत्पादन क्षेत्र वणी रंभापूर, मध्यवर्ती संशोधन केंद्रांतर्गत सर्वाधिक शेतजमीन आहे. या दोन्ही प्रक्षेत्रावर विविध संशोधन कंेद्रे आहेत; पण पाणीच नाही. शरद सरोवर विमानतळ विस्तारीकरणात गेल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आता कायमस्वरू पी पाण्याचा स्रोतही उपलब्ध नाही. बोअरच्या पाण्यावर संशोधन जगविण्यासाठी शास्त्रज्ञांची धडपड सुरू  आहे. 

बोअरवेलच्या पाण्यावर संशोधन 
कृषी विद्यापीठात काही भागात बोअरवेल आहेत; पण यावर्षी कृषी विद्यापीठ परिसरातील पाणी पातळी दीड ते दोन मीटरने घसरली आहे. जे काही पाणी उपलब्ध आहे, त्या पाण्यावर रब्बी बियाण्यांचा बीजोत्पादन कार्यक्रम घेण्याचे कृषी विद्यापीठाचे प्रयत्न सुरू  आहेत; पण उन्हाळ्यात पाणी मिळणारच नसल्याने शहरातील सांडपाणी प्रक्रिया करू न ते वापरण्याचे नियोजन केले आहे. 

पाचशे ते सातशे एकरावर होईल सिंचन 
शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करू न ते पाणी ५00 ते ७00 एकरावरील पिकांना पाणी वापरण्यासाठीचे नियोजन केले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तासोबत दीर्घ चर्चा झाली.


दोन प्रकल्प प्रस्तावित 
महापालिकेने दोन सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित केले असून, शिलोडा येथे ३0 एमएलडीचा (३ कोटी लीटर) तर कृषी विद्यापीठात ७ एमएलडीचा (७0 लाख लीटर) प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

दररोज मिळणार 70 लाख लीटर शुद्ध पाणी 
कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाजवळील पाच एकर जागा सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाला देण्यात येणार असून, या माध्यमातून दररोज  ७0 लाख लीटर शुद्ध पाणी कृषी विद्यापीठाला देण्यात येणार आहे.

कृषी विद्यापीठाकडे कायमस्वरू पी पाण्याचे स्रोत बंद झाल्याने शहरातील सांडपाण्याचा उपयोग करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. लवकरच हा प्रस्ताव महापालिकेला देण्यात येईल.
- डॉ. व्ही.एम. भाले, कुलगुरू , 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

कृषी विद्यापीठ जागा उपलब्ध करू न देणार असल्याने तेथे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प टाकण्यात येईल. त्यासाठी कृषी विद्यापीठाकडून जागेच्या बदल्यात प्रकल्प देखभाल दुरुस्तीच्या खर्चाबाबत चर्चा करू , त्यासाठी प्रथम प्रस्ताव येणे महत्त्वाचे आहे.
- विजय अग्रवाल, महापौर, महापालिका, अकोला

Web Title: Akola: Dr. Punjababrao Deshmukh Agricultural University will use wastewater for crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.