Akola: गुढीपाडव्याला निघाली संस्कृती संवर्धन समितीची स्वागत यात्रा, फलकांद्वारे मतदानाविषयी जनजागृती

By नितिन गव्हाळे | Published: April 9, 2024 02:39 PM2024-04-09T14:39:28+5:302024-04-09T14:43:09+5:30

Akol News: गुढीपाडवा अर्थात चैत्र शुक्ल प्रतिपदा, हिंदू नववर्षाची सुरूवात. यानिमित्त शहरातून ग्रामदैवत राजराजेश्वर, जय श्रीरामचा जयघोष करीत, संस्कृती संवर्धन समितीच्यावतीने ९ एप्रिल रोजी सकाळी जल्लोषात स्वागत यात्रा काढण्यात आली.

Akola: Culture Conservation Committee's welcome trip to Gudipadwa, awareness about voting through billboards | Akola: गुढीपाडव्याला निघाली संस्कृती संवर्धन समितीची स्वागत यात्रा, फलकांद्वारे मतदानाविषयी जनजागृती

Akola: गुढीपाडव्याला निघाली संस्कृती संवर्धन समितीची स्वागत यात्रा, फलकांद्वारे मतदानाविषयी जनजागृती

-नितीन गव्हाळे 
अकोला - गुढीपाडवा अर्थात चैत्र शुक्ल प्रतिपदा, हिंदू नववर्षाची सुरूवात. यानिमित्त शहरातून ग्रामदैवत राजराजेश्वर, जय श्रीरामचा जयघोष करीत, संस्कृती संवर्धन समितीच्यावतीने ९ एप्रिल रोजी सकाळी जल्लोषात स्वागत यात्रा काढण्यात आली. यात्रेच्या स्वागतासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये रंगबेरंगी आकर्षक रांगोळी काढून, फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतषबाजी करून उत्साहात स्वागत करण्यात आले.

प्रारंभी राजराजेश्वर मंदिरात लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे, कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील, आमदार रणधीर सावरकर, संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांनी महापूजा केल्यानंतर स्वागत यात्रेला सुरूवात करण्यात आली. यात्रेत पारंपरिक वेशभूषा, केशरी फेटे घालून नागरिक सहभागी झाले होते. ही यात्रा काळा मारोती, सिटी कोतवाली चौकातून मोठे राम मंदिर मार्गे जुना कपडा बाजार, जैन मंदिर, गांधी चौक, राणी सती धाम मंदिर येथून मार्गक्रमण करीत, टाॅवर चौक, रतनलाल प्लॉट चौकमार्गे सिव्हिल लाइन, जवाहर नगर चौक, बारा ज्योतिर्लिंग मंदिर तेथून राऊतवाडी मार्गे जठारपेठ चौक येथून मार्गक्रमण करत बिर्ला राम मंदिर येथे पोहोचली. याठिकाणी महाआरतीने स्वागत यात्रेचा समारोप झाला. रॅलीमध्ये संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रा.नितीन बाठे, माजी अध्यक्ष डॉ. आर बी हेडा, कार्याध्यक्ष हरिष आलिमचंदानी, स्वागताध्यक्ष पुरुषोत्तम मालाणी, स्वागत समितीचे उपाध्यक्ष नीलेश देव, नरेंद्र देशपांडे, गोपाल खंडेलवाल, महेश जोशी, मोतीसिंह मोहता, हेमेंद्र राजगुरू, इंद्राणी देशमुख, सुधाकर अंबुसकर, निनाद कुळकर्णी, चंदा जयस्वाल,आशा खोकले, चित्रा बापट, अर्चना शर्मा, निकेश गुप्ता, डॉ. माधव देशमुख, रामप्रकाश मिश्रा, विवेक देवकते, नंदकिशोर आवारे, अभय बिजवे, विनोद देव, मनीष चंदानी, अशोक पाध्ये, आनंद बांगड, समितीचे संयोजक विनोद जकाते, सहसंयोजक स्वानंद कोंडोलीकर, राम भिरड, महिला संयोजिका सोनल ठक्कर,मीनाक्षी आपोतीकर, रश्मी कायन्दे, कोषाध्यक्ष शरद वाघ, प्रचार प्रमुख समीर थोडगे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.
 
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
संस्कृती संवर्धन समितीची स्वागत यात्रा राणीसती धाम मंदिर मार्गावरून स्वागत यात्रेने न्यू राधाकिसन प्लॉट मार्गे अशोक वाटिका येथे पोहोचून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
 
राम दरबार विशेष आकर्षण
लोकसभेची निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर समितीच्यावतीने मतदानाबाबत संदेेश देणारे विविध प्रकारचे फलक घेऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. या यात्रेत मर्यादा पूरुषोत्तम प्रभू श्रीराम,सीता माई,लक्ष्मण,राम भक्त हनुमान यांचा राम दरबार विशेष आकर्षण होते.

संस्कृती संवर्धनासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार एकत्र
गुढीपाडव्यानिमित्त संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने राजराजेश्वर मंदिरातून काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेत
प्रतिस्पर्धी उमेदवार कॉंग्रेसचे डॉ. अभय पाटील, भाजपचे अनुप धोत्रे एकत्र आले होते. त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन करून सोबत फोटोसुद्धा काढून एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: Akola: Culture Conservation Committee's welcome trip to Gudipadwa, awareness about voting through billboards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.