अकोला : महाराष्ट्र एसटी कामगार संघटना पदाधिकार्‍यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 01:34 AM2018-01-29T01:34:12+5:302018-01-29T01:35:00+5:30

अकोला : महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या अकोला विभागीय अध्यक्षपदी उदय गंगाखेडकर, तर सचिवपदी रूपम वाघमारे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. २६ जानेवारी रोजी अकोला येथील जिल्हा परिषद कर्मचारी भवनातील सभागृहात झालेल्या सभेत ही निवड झाली. संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंतराव ताटे, प्रादेशिक सचिव अविनाश जहागीरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी कैलास नांदूरकर होते.

Akola: The choice of office bearers of Maharashtra ST Workers Union | अकोला : महाराष्ट्र एसटी कामगार संघटना पदाधिकार्‍यांची निवड

अकोला : महाराष्ट्र एसटी कामगार संघटना पदाधिकार्‍यांची निवड

Next
ठळक मुद्देकर्मचारी पुन्हा संपावर जाणार : हनुमंत ताटे

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या अकोला विभागीय अध्यक्षपदी उदय गंगाखेडकर, तर सचिवपदी रूपम वाघमारे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. २६ जानेवारी रोजी अकोला येथील जिल्हा परिषद कर्मचारी भवनातील सभागृहात झालेल्या सभेत ही निवड झाली. संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंतराव ताटे, प्रादेशिक सचिव अविनाश जहागीरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी कैलास नांदूरकर होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊ फाटक  यांच्या प्रतिमेला हारार्पण करून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तत्कालीन कोषाध्यक्ष गंगाखेडकर यांनी मागील वर्षीचा हिशेब सादर केला. त्यास देवानंद पाठक यांनी मंजुरी दिली. त्यानंतर एकमताने अध्यक्ष व सचिवांची निवड करण्यात आली. दरम्यान, वार्षिक सभेत प्रादेशिक सचिव अविनाश जहागीरदार यांचा मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. संघटनेचे कें द्रीय अध्यक्ष संदीप  शिंदे, सरचिटणीस हनुमंत ताटे यांच्या हस्ते मानपत्र दिले गेले. दरम्यान, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या या सभेत, एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार असल्याचे जाहीर केले. दिवाळीच्या वेळी चार दिवस कामगार संपावर गेले असताना उच्चस्तरीय समिती गठित करून दिशाभूल करण्यात आली. उच्चस्तरीय समितीने १0७६ कोटींचा प्रस्ताव देण्याऐवजी  ७४१ कोटींचा प्रस्ताव सादर केल्याने घोर निराशा झाली  आहे. त्यामुळे समितीच्या अहवालाची होळी करण्यात आली. आता कृती समितीच्यावतीने लवकरच आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. विभागीय कार्यालयासाठी मंगेश बोर्डे, गणेश डांगे, विलास बोधनकर, दत्ता सहारे, राजीक देशमुख, सचिन हाताळकर, रहीम खान, अभिनय पांडे,  श्रीकृष्ण तराळे, प्रभुदास तळोकार, दत्तात्रय इंगळे, दिनकर डवरे, गजानन तिडके, संजय भिवरकर, पृथ्वीराज चव्हाण, देवकुमार खिराडे, नारायण शेळके, मुकेश शिकवाल, विजय गवई, नरेश मुराई, जे.ए. राऊत, संतोष घोगरे यांची निवड करण्यात आली. सभेचे संचालन दीपक वैष्णव यांनी केले. आभार गणेश डांगे यांनी मानले. सभेच्या यशस्वितेसाठी श्याम दुबे, अभिनय पांडे, सुधीर महाजन, प्रवीण जयस्वाल, जयवंत देशमुख, जाफरभाई, अरूण माहुदे, प्रमोद दंडगव्हाळ, संजय वैद्य आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Akola: The choice of office bearers of Maharashtra ST Workers Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.