कृषी कायदा शेतकरी हिताचा; विरोधकांकडून राजकारण - संजय धाेत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 07:33 PM2020-12-14T19:33:08+5:302020-12-14T19:33:16+5:30

Sanjay Dhotre News हक्कावर, अधिकारांवर काेणतीही गदा येणार नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांनी स्पष्ट केले.

Agricultural law in the interest of farmers; Politics from Opposition - Sanjay Dhaetre | कृषी कायदा शेतकरी हिताचा; विरोधकांकडून राजकारण - संजय धाेत्रे

कृषी कायदा शेतकरी हिताचा; विरोधकांकडून राजकारण - संजय धाेत्रे

Next

अकाेला : केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कृषी कायद्याला विराेध दर्शवित पंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्ली येथे आंदाेलन छेडले. सुधारित कायद्यामुळे त्या दाेन्ही राज्यांतील गव्हाच्या खरेदी प्रक्रियेवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती असून, त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्र शासन तयार आहे. नवीन कृषी कायदा शेतकरी हिताचा असताना काही राजकीय पक्षांकडून नाहक राजकारण केले जात असून, यामुळे गरजू शेतकरी भरडला जाण्याची शक्यता असल्याचे सांगत केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांनी साेमवारी आयाेजित ऑनलाइन पत्रकार परिषदेत केंद्र शासनाच्या धाेरणाविषयी माहिती दिली.

नवीन कृषी कायद्यानुसार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल काेणत्याही बाजारपेठेत विकता येणार आहे. सध्याची बाजार समित्यांची व्यवस्था भविष्यातही कायम राहणार आहे. करार शेती (काॅन्ट्रॅक्ट फार्मिंग) शेतकऱ्यांसाठी नवा विषय नाही. आज राेजी महाराष्ट्रात ७० टक्के शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांना पेरणीसाठी येणारा खर्च व उत्पादन लक्षात घेता शेती हा व्यवसाय ताेट्यात असल्याचे दिसून येते. अशा शेतकऱ्यांसाठी करार शेती फायद्याची ठरणार असून, यामुळे त्यांच्या मालकी हक्कावर, अधिकारांवर काेणतीही गदा येणार नसल्याचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांनी स्पष्ट केले. किमान आधारभूत किमतीच्या मुद्यावर जाणीवपूर्वक गैरसमज पसरवला जात आहे. यापुढेही अन्नधान्याची खरेदी ‘एमएसपी’नुसारच सुरू राहणार असून, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा स्पष्ट केले आहे. देशात विविध राज्यात करार शेतीचे कायदे यापूर्वीच अमलात आणले असून, शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळत असल्याचे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री धाेत्रे यांनी सांगितले.

 

शेतकऱ्यांनाे विश्वास ठेवा; बदल स्वीकारा!

मागील सहा वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र शासनाने विविध याेजनांची अंमलबजावणी केली. पीएम किसान याेजना असाे वा किसान आत्मसन्मान याेजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ६ हजार रुपये अनुदान दिले. यावर ९२ हजार काेटी रुपये खर्च झाले असून, ही मदत यापुढेही कायम राहील. शेतकऱ्यांनी काळानुरूप बदल स्वीकारला पाहिजे. त्यांची कदापिही फसगत हाेणार नाही, असे ना. संजय धाेत्रे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Agricultural law in the interest of farmers; Politics from Opposition - Sanjay Dhaetre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.