मूर्तिजापूर तालुक्यातील २३ गावे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 07:10 PM2021-10-04T19:10:15+5:302021-10-04T19:10:22+5:30

23 villages in Murtijapur taluka in darkness : यासाठी १ कोटी ७ लाख ३७ हजार ४७० पथदिवे देयके बाकी आहे तर पाणी पुरवठ्याचे २३ लाख ५८ हजार ७३८ अशी थकबाकी आहे. 

23 villages in Murtijapur taluka in darkness | मूर्तिजापूर तालुक्यातील २३ गावे अंधारात

मूर्तिजापूर तालुक्यातील २३ गावे अंधारात

Next

-संजय उमक 
मूर्तिजापूर : महावितरण कडून ग्रामपंचायतीनां पथदिवे व स्थानिक पाणीपुरवठ्या वीज पुरवठा करण्यात येतो, याची देयके अद्याप पर्यंत अदा न केल्याने महावितरणने ग्रामपंचायतचा वीज तोडणी कार्यक्रम हातात घेतला आहे. या मोहिमेंतर्गत सद्यस्थितीत तालुक्यात २३ गावे अनेक दिवसांपासून अंधारात आहेत.  तर १७ गावांचा पाणी पुरवठा खंडित झाला असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
           एप्रिल महिन्यापासून महावितरणने वसूली अभियान जोरात सुरु केले, ग्रामपंचायती मार्फत गाव पातळीवर राबविण्यात येणाऱ्या नागरीकांच्या मुलभूत सोईची जबाबदारी ग्रामपंचायतवर असताना या मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. अशातच ग्रामपंचायतीनी पथदिवे व पाणी पुरवठा करणाऱ्या मोटपंपाचे वीज बिल भरणा न केल्याने तालुक्यातील २३ गावांवर अंधाराचे साम्राज्य ओढवल्या गेले आहे तर १७ गावांना कृत्रिम जल संकटाचा सामना करावा लागत आहे. यासाठी १ कोटी ७ लाख ३७ हजार ४७० पथदिवे देयके बाकी आहे तर पाणी पुरवठ्याचे २३ लाख ५८ हजार ७३८ अशी थकबाकी आहे. 
         सध्या राज्यात कोरोना परिस्थिती पाहता ग्रामीण भागात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. आरोग्य यंत्रणा बीजेअभावी उपकरणांचा वापर करू शकत नाही. ग्रामीण भागात पथ दिव्यांची आणि पाणी पुरवठा प्रकल्प योजनेची विद्युत देयके अदा न केल्याने विकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सद्य परिस्थिती पहाता पंधराव्या वित्त आयोगाच्या अबंधित अनुदानानुन पथ पिण्याची देयके आणि बंधित अनुदानातुन पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके अदा करण्यास २३ जून रोजी ग्राम विकास विभागाकडून तसे परीपत्रक काढून मान्यता दिली आहे. सर्व प्रथम पथ दिव्यांची विद्युत देयके आणि पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके अदा करून १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या बंधित आणि अबंधित निधीतून इतर खर्च नंतर
करावा, ग्रामपंचायतीने लवकरात लवकर सौर उर्जेवर भर देऊन त्याचा वापर करण्यास प्राधान्य दयावे, व्यवस्थित लेखांकन होण्याच्या दृष्टीने व घटनात्मक दुरुस्तीच्या अनुषंगाने त्या त्या
ग्रामपंचायतीने १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अबंधित अनुदानातून (अनटाइड) पथ
दिव्यांची वीज देयके आणि बंधित अनुदानातून (टाइड) पाणी पुरवठा योजनांची वीज
देयके ग्रामपंचायत स्तरावरब अदा केली जाईल असेही परीपत्रकात म्हटले आहे. 
         फेब्रुवारी २०२१ पर्यंत ही वीज देयके शासना मार्फत अदा केली जाता असे परंतु आता ती देयके ग्रामपंचायतीच्या खांद्यावर देण्यात आली आहे. शासन हा भार उचलण्यास आता तयार नसल्याने त्या बिलाची रक्कम ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून अदा करायची आहे.

Web Title: 23 villages in Murtijapur taluka in darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.