१६ वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा आरोपी अटकेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 10:14 PM2017-11-22T22:14:38+5:302017-11-22T22:22:11+5:30

जुने शहरातील शिवाजीनगरातील १६ वर्षीय मुलीवर बलात्कार  करणार्‍या आरोपीस जुने शहर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला  न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपीस दोन दिवसांची पोलीस  कोठडी सुनावली.

A 16-year-old girl is accused of raping a girl! | १६ वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा आरोपी अटकेत!

१६ वर्षीय मुलीवर बलात्कार करणारा आरोपी अटकेत!

Next
ठळक मुद्देलग्नाचे आमिष दाखवून केले सतत सहा महिने लैंगिक शोषणआरोपी ज्ञानेश्‍वर राऊतला दोन दिवसांची पोलीस  कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला - जुने शहरातील शिवाजीनगरातील १६ वर्षीय मुलीवर बलात्कार  करणार्‍या आरोपीस जुने शहर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला  न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपीस दोन दिवसांची पोलीस  कोठडी सुनावली.
शिवनगरातील रहिवासी ज्ञानेश्‍वर भगीरथ राऊत याने शिवाजीनगरातील  एका १६ वर्षीय मुलीला २२ एप्रिल २0१७ रोजी पळवून नेले. त्यानंतर सदर  मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे सतत सहा महिने लैंगिक शोषण  केले. सदर मुलगी घरी परतल्यानंतर या मुलीची जुने शहर पोलिसांनी  वैद्यकीय तपासणी केली असता तिचा लैंगिक छळ झाल्याचे उघड झाले.  त्यामुळे मुलीच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्‍वर राऊत  याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३, ३७६, ५0६ तसेच  पॉस्को कायद्याच्या कलम ४ आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला. मात्र,  आरोपी फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत असतानाच तपास अधिकारी  सतीश पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी आरोपीस अटक  केली. त्यानंतर त्याला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता  न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास  ठाणेदार गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक स तीश पाटील करीत आहेत.

Web Title: A 16-year-old girl is accused of raping a girl!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.