अकोट शहरातील १६ धार्मिक स्थळे हटविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:42 AM2017-11-14T01:42:54+5:302017-11-14T01:44:03+5:30

अकोट : अकोट शहरातील अतिक्रमीत जागेवर बांधलेली १६ धार्मिक स्थळे १३ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात निष्कासित करण्यात आली. नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे प्रशासनाने पहिल्या दिवशी ही मोहीम निर्विवादपणे राबविली.

16 religious places in Akot city deleted! | अकोट शहरातील १६ धार्मिक स्थळे हटविली!

अकोट शहरातील १६ धार्मिक स्थळे हटविली!

Next
ठळक मुद्देपोलिसांचा बंदोबस्त, नागरिकांचे सहकार्यआजही सुरू राहणार अतिक्रमण हटाव मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : अकोट शहरातील अतिक्रमीत जागेवर बांधलेली १६ धार्मिक स्थळे १३ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात निष्कासित करण्यात आली. नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे प्रशासनाने पहिल्या दिवशी ही मोहीम निर्विवादपणे राबविली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील ४७ अतिक्रमीत असलेली धार्मिक स्थळे निष्कासित करण्यात येत आहेत. या मोहिमेचा प्रारंभ नगर परिषदेमधील हनुमान मंदिर हटवून करण्यात आला. 
जिल्हा समितीने मंजूर केलेल्या यादीतील सन १९६0 नंतरची अकोट शहरातील ४७ अतिक्रमीत असलेली धार्मिक स्थळे पाडण्याकरिता नगर परिषदने विविध पथके तयार केली होती. सकाळी ५ वाजल्यापासून नगर परिषद व नंतर बस स्थानकावरील मंदिरांचे अतिक्रमण निष्कासित करून दुपारी ४ वाजेपर्यंत डोहोरपुर्‍यातील मरीमाता मंदिर हटवून या मोहिमेला ब्रेक देण्यात आला. धार्मिक स्थळांचे अतिक्रमणे काढत असताना विविध धार्मिक स्थळांचे विश्‍वस्त, पदाधिकारी व परिसरातील नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य केले. कुठेही वाद-विवाद न करता मोहीम शांततेत पार पडली.  १४ नोव्हेंबर रोजी सकाळपासून पुन्हा ही मोहीम राबविल्या जाणार आहे. या मोहिमेमध्ये नगर परिषद, महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांमध्ये समन्वय दिसून आला. नगर परिषद मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी धार्मिक स्थळे निष्कासित करण्याकरिता मूर्ती स्थलांतरीत पथक, धार्मिक स्थळे निष्कासित पथक, धार्मिक स्थळांचा मलबा उचलण्याचे पथक, अग्निशमक पथक, विद्युत विभाग व धार्मिक स्थळ निष्कासित करण्याबाबतचे राखीव पथक गठीत केले आहे.  मोहिमेदरम्यान अपर जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी निष्कासित करीत असलेल्या धार्मिक स्थळी भेट देऊन पोलीस अधिकार्‍यांना सूचना दिल्या. उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी गावीत, तहसीलदार विश्‍वनाथ घुगे, मुख्याधिकारी गीता ठाकरे, शहर पोलीस निरीक्षक गजानन शेळके, नायब तहसीलदार विजय खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड, पोलीस उपनिरीक्षक शरद माळी, उपमुख्याधिकारी दिनकर शिंदे, बांधकाम अभियंता स्नेहलकुमार बोमकंटीवार, न.प.प्रशासन अधिकारी नंदकिशोर हिंगणकर, स्वच्छता निरीक्षक प्रदीप रावणकार, पाणी पुरवठा पर्यवेक्षक रोशन कुमरे, स्वच्छता निरीक्षक चंदन चंडालीया, अग्निशमन पर्यवेक्षक रुपेश जोगदंड, विद्युत परिवेक्षक नंदन गेडाम, संजय बेलुरकर, मिलिंद दिवाळकर, मंडळ अधिकारी सायरे, तलाठी दिनेश मोहोकार, विशाल शेरेकर, रतन, जांभुरकर तसेच पथक प्रमुख आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.

हटवण्यात आलेली धार्मिक स्थळे  
हनुमान मंदिर (बस स्टॅन्ड), हनुमान मंदिर (इंदिरा नगर), कालंका मंदिर (इंदिरा नगर), सीतलामाता मंदिर (एसडीओ निवासस्थान जवळ), दुर्गा माता मंदिर (सिंधी कॅम्प), विध्यांचल देवी मंदिर( अग्रसेन चौक), हनुमान मंदिर (गाजी प्लॉट), शंकरजी मंदिर (अंजनगाव रोड), शिव मंदिर(कराळे प्लॉट), हनुमान मंदिर (बर्डे प्लॉट), गौतम बुद्ध पुतळा (सती मैदान), गुणंवत महाराज मंदिर (सती मैदान), शिव मंदिर (आंबोडी वेस), हनुमान मंदिर (डोहोरपुरा), मरीमाता मंदिर (डोहोरपुरा), गजानन मंदिर (देशपांडे वेटाळ).

Web Title: 16 religious places in Akot city deleted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.