अकोला जिल्ह्यातील पंधराशेवर विद्यार्थ्यांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 02:32 PM2019-01-08T14:32:41+5:302019-01-08T14:33:15+5:30

अकोला: पोलीस उदय दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात पोलीस आधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या संकल्पनेमधून रस्ता वाहतूक सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ४० शाळेमधील १ हजार ५०० विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

1500 students Participating in the painting competition | अकोला जिल्ह्यातील पंधराशेवर विद्यार्थ्यांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग

अकोला जिल्ह्यातील पंधराशेवर विद्यार्थ्यांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग

Next

अकोला: पोलीस उदय दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात पोलीस आधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या संकल्पनेमधून रस्ता वाहतूक सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ४० शाळेमधील १ हजार ५०० विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये ८० शिक्षकांनीही सहभागी होत चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
अपघातशून्य अकोला शहर, वाहतूक सुरक्षा नियमांचे चित्र, अंध, अपंग, वृद्ध, रुग्णवाहिका सेवा सुरू असताना अगोदर मार्ग मोकळा करून देणे, झेब्रा क्रॉसिंगचा वापर करणे, हेल्मेट, सिट बेल्टचा वापर करणे, या विषयांवर छायाचित्र काढणे व त्यात रंग भरणे या विषयावरील चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये जिल्ह्यातील १ हजार ५०० वर विद्यार्थ्यांचा सहभाग असून, या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देऊन त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. विध्यार्थी यांना पोलीस दलातील वापरली जाणारी शस्त्रे दारूगोळा, डॉग स्कॉडचा वापर या संदर्भात माहिती देण्यात आली. बॉम्ब शोधक व नाशक पथक सुरक्षा टीम ची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. गुन्हे शोध पथकाची माहिती, सायबर गुन्हेबाबतची माहिती, शहर वाहतूक नियंत्रण शाखेची माहिती व पोलीस विभागाच्या पुस्तिका उपकरने याबाबत विध्यार्थ्यांना माहिती देऊन पुस्तिका वाटप करण्यात आल्या. यासोबतच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच ‘जंबुरे का खेल’ या पथनाट्याद्वारेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत त्यांच्यामध्ये जनजागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमासाठी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी हेल्मेटचा वापर करावा, अतिवेगाने वाहन चालवू नये, सिट बेल्टचा वापर करावा, मद्य सेवन करून वाहन चालवू नये, सुरक्षित प्रवास करावा, आपली जीवन सुरक्षा आपले हाती, या संदर्भात मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांनी मार्गदर्शन केले तर वाहतूक शाखा प्रमुख तथा सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांनी परिश्रम घेतले.
 

 

Web Title: 1500 students Participating in the painting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.