पवनऊर्जा प्रकल्पातील साहित्य चोरणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 04:01 PM2017-08-19T16:01:34+5:302017-08-19T16:01:34+5:30

सुप्यानजीकच्या शहाजापूर कवड्या डोंगरावरील सुझलॉन पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पातील साहित्य चोरणारी टोळी शुक्रवारी दुपारी सुपा पोलिसांनी जेरबंद केली

Wind, energy, materials, theft, gang, catch, | पवनऊर्जा प्रकल्पातील साहित्य चोरणारी टोळी जेरबंद

पवनऊर्जा प्रकल्पातील साहित्य चोरणारी टोळी जेरबंद

Next
पा: पारनेर तालुक्यातील सुप्यानजीकच्या शहाजापूर कवड्या डोंगरावरील सुझलॉन पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पातील साहित्य चोरणारी टोळी शुक्रवारी दुपारी सुपा पोलिसांनी जेरबंद केली असून या टोळीकडून अडीच लाख किंमतीची कॉपर केबल जप्त केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नयन राजेंद्र तांदळे (वय २३, रा. सावेडी अहमदनगर), विठ्ठल भाऊराव साबळे (वय २४, रा. घोडेगाव, ता.नेवासा), रामदास दिलीप पवार (वय ३० रा. पवारवाडी, सुपा), निलेश अण्णासाहेब दळवी (वय १९, रा. हंगा, ता. पारनेर), प्रशांत सुभाष करंजुले (वय २४, रा. पाडळी रांजणगाव, ता. पारनेर), भूषण माधव पवार (वय २२, रा. सुपा), प्रमोद तात्या गिरी (वय २६, हंगा, ता. पारनेर) यांचा समावेश आहे. कवड्या डोंगरावर सुझलॉन कंपनीच्या वीज तयार करणाºया ६३ पवनचक्क््या कार्यान्वित आहेत. १३ आॅगस्ट रोजी पहाटे तीनच्या सुमारास कंट्रोल केबिनमधून अभियंता राजेंद्र साबळे यांनी बी ए १९ या मनोºयाचा वीज पुरवठा बंद झाल्याचे सुरक्षा रक्षक संतोष लंके व विक्रम काळे यांना कळविले. मनोºयाचे कुलूप व कडी तुटलेल्या अवस्थेत आढळून आली. तसेच मनोºयामधील १६५ मीटर केबल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. सुपा पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली असता सुपा बस स्थानकाजवळील एका घरात केबलचे काळे वेष्टन, व्हॅकसा ब्लेड, रबरी हातमोजे आदी साहित्य आढळून आले. ही केबल पवन ऊर्जा प्रकल्पातील असल्याची खात्री झाल्यानंतर वरील सात जणांना ताब्यात घेऊन चोरीची केबल ताब्यात घेण्यात आली. आरोपींनी वायर सोलून त्यातील कॉपर नगर येथील मुकुंदनगर भागात एका जणास २३० रुपये प्रति किलो दराने ६० हजार रुपयाला विकल्याची कबुली प्रमोद तात्या गिरी व प्रशांत करंजुले या आरोपींनी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Web Title: Wind, energy, materials, theft, gang, catch,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.