विखे पाटलांनी केली कोपरगावातील मंदिरांत स्वच्छता; हनुमान चालीसा पठण

By सचिन धर्मापुरीकर | Published: January 20, 2024 05:26 PM2024-01-20T17:26:29+5:302024-01-20T17:26:38+5:30

महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन

Vikhe Patals cleaned the temples in Kopargaon; | विखे पाटलांनी केली कोपरगावातील मंदिरांत स्वच्छता; हनुमान चालीसा पठण

विखे पाटलांनी केली कोपरगावातील मंदिरांत स्वच्छता; हनुमान चालीसा पठण

कोपरगाव (जि. अहमदनगर) : प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा सोमवारी होणार आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक शहरात आणि गावा-गावात धार्मिक कार्यक्रम व मंदिरांची साफ सफाई करण्याचे आवाहन देशाच्या पंतप्रधानांनी केले आहे. त्यानुसार शनिवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोपरगाव येथे शनि मंदिर व अंबिका मंदिरातील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.मंदिर स्वच्छता अभियानानिमित्त शनिवारी कोपरगाव शहरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी धावता दौरा केला. शहरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी स्मारकास भेट देऊन पुष्पहार अर्पण केले.

माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे व भाजपा, वसंत स्मृती कार्यालयाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.शहरातील शनी मंदिर व अंबिका मंदिरात धार्मिक वातावरणात हनुमान चालीसा पठण व स्वच्छता अभियान पार पडले. या प्रसंगी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्वच्छता अभियानाचे महत्व व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा लोकाभिमुख कारभार व श्रीरामजन्मभूमीचा इतिहास व महत्व विशद केले. यावेळी आ.आशुतोषजी काळे यांनी शहरातील धार्मिक उत्साह व दि. २२ रोजी होणारे नियोजित कार्यक्रम सांगितले. यावेळी काका कोयटे, राजेशजी परजणे, राजेंद्रजी जाधव, विजय वहाडणे, विनायक गायकवाड, सुभाष दवंगे, चेतन खुबाणी, विकास आढाव, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, अंबिका तरुण मंडळ सदस्य व असंख्य हनुमान भक्त उपस्थित होते. हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम महिला-पुरुष भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. तेथेच अकरा हजार बुंदी लाडूंचा प्रसाद बनविण्याचा शुभारंभही करण्यात आला.

त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांसह पायी जाऊन मंत्री विखे यांच्या हस्ते स्वा. वि.दा. सावरकर चौक फलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर गुरुद्वारा येथे जाऊन पूजन करण्यात आले. यावेळी शीख-पंजाबी बंधवांनी विखे पाटील यांचा सन्मान केला.

Web Title: Vikhe Patals cleaned the temples in Kopargaon;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.