अहमदनगरला शिक्षकांच्या सभेत अभूतपूर्व राडा, दहा शिक्षकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 01:27 PM2017-09-24T13:27:23+5:302017-09-24T14:16:35+5:30

An unprecedented Rada in Ahmednagar's teacher's meeting, seven teachers in police custody | अहमदनगरला शिक्षकांच्या सभेत अभूतपूर्व राडा, दहा शिक्षकांना अटक

विरोधकांनी सभात्याग करीत सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला़

Next
ठळक मुद्देबँकेच्या अध्यक्षांसह एकूण दहा जणांना अटक संजय धामणे, भाऊसाहेब हराळ, राजेंद्र जायभाये, रामदास गव्हाणे, बाळासाहेब कदम, रावसाहेब रोहोकले व अन्य एक यांच्यासह तीन महिला अशा एकूण दहा शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे.

अहमदनगर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या सभेमध्ये अभूतपूर्व राडा झाल्याची घटना रविवारी घडली. बँकेच्या अध्यक्षांसह राडेखोर दहा शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे.
शिक्षक बँकेमध्ये गुरुमाऊली पॅनलची सत्ता आहे़ रविवारी सकाळी ११ वाजता बँकेची सर्वसाधारण सभा नंदनवन लॉन येथे सुरु झाली़ सभा सुरु होताच आमच्या मागण्या मान्य करा, असा नारा देत विरोधक व्यासपीठावर चढले़ माईकचा ताबा घेतला़ बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांना विरोधकांनी पैशांचा हार घालत शिक्षक बँकेतील सॉफ्टवेअर प्रणालीत मोठा घोळ झाल्याचा आरोप केला.
शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा विरोधी सभासदांनी उधळून लावण्याचा प्रयत्न करीत अभूतपूर्व गोंधळ घालण्यास सुरुवात केली़ एकमेकांना मारण्याची भाषा वापरत काही शिक्षकांनी अश्लील भाषाही वापरली़ शिक्षकांचा गोंधळ वाढतच असताना पोलिसांनी हस्तक्षेप करुन गोंधळी शिक्षकांना आवरण्याचा प्रयत्न केला़ मात्र, या गोंधळी शिक्षकांनी पोलिसांनाही जुमानले नाही़ त्यामुळे पोलिसांनी संजय धामणे यांच्यासह गोंधळी शिक्षकांना ताब्यात घेत कारवाई करण्याचा इशारा दिला़ त्यानंतर गोंधळ थोडा कमी झाला़ पुढील सभा पोलीस बंदोबस्तात सुरु ठेवण्याची वेळ सत्ताधारी मंडळावर आली़ सभा पुन्हा सुरु होताच विरोधकांनी सभात्याग करीत सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सात शिक्षकांना कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले़ त्यांना सोडविण्यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक दाखल झाले आहेत.

Web Title: An unprecedented Rada in Ahmednagar's teacher's meeting, seven teachers in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.