दोन लाखांची रोकड जप्त

By admin | Published: September 23, 2014 10:53 PM2014-09-23T22:53:15+5:302014-09-23T23:02:57+5:30

अहमदनगर : नगर-कल्याण रोडवर एका वाहनामधून नेण्यात येत असलेली दोन लाख रुपयांची रक्कम निवडणूक शाखेच्या पथकाने जप्त केली आहे.

Two lakh cash seized | दोन लाखांची रोकड जप्त

दोन लाखांची रोकड जप्त

Next

अहमदनगर : नगर-कल्याण रोडवर एका वाहनामधून नेण्यात येत असलेली दोन लाख रुपयांची रक्कम निवडणूक शाखेच्या पथकाने जप्त केली आहे. या प्रकरणी कारवाईसाठी तोफखाना पोलीस ठाण्यात प्रकरण देण्यात आले आहे. सदर रक्कम निवडणुकीच्या कारणासाठी नसल्याचे स्पष्ट झाल्याने रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा निवडणूक शाखेच्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाद्वारे दररोज वाहनांची तपासणी करण्यात येते. वाहनांमध्ये अवैध दारू, रोख रक्कम आहे का याची तपासणी केली जाते. पथकाचे प्रमख सुमित घोरपडे, सहायक फौजदार कैलास शिरसाट, ए.आय. शेख, दिगंबर शेलार यांच्या पथकाने सकाळपासून नगर-कल्याण रोडवर वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये भाळवणी-नगर रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनामध्ये ( एम.एच.-१४, डीएल.- ८५७०) दोन लाख रुपयांची रक्कम आढळून आली. दोन लाख रुपये हे नवीन वाहन खरेदी करण्यासाठी घेवून जात असल्याचे वाहन चालकाने सांगितले. मात्र त्याबाबतचा काहीही पुरावा नसल्याने पथकाने वाहनचालक माणिक महादेव खेडकर याच्यासह वाहनामधील तिघांना रकमेसह ताब्यात घेतले. पथकाने पुढील कारवाईसाठी हे प्रकरण तोफखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत या पैशांची चौकशी करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)
दोन लाख रुपयांबाबत ठोस पुरावा संबंधित देऊ शकलेले नाहीत.
मात्र सदरच्या पैशाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अद्याप तरी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. याबाबत चौकशी सुरू असून त्यामध्ये तथ्य आढळल्यास कारवाई होईल.
- लक्ष्मण काळे, पोलीस निरीक्षक, तोफखाना

Web Title: Two lakh cash seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.