भीषण अपघातात हळगांवमधील दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 04:30 PM2018-11-04T16:30:52+5:302018-11-04T16:31:07+5:30

अहमदनगर - सोलापूर महामार्गावरील मांगी ( ता. करमाळा ) शिवारातील अवघड वळणावर ट्रक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले

Two dead in Hargaon accident, one seriously injured | भीषण अपघातात हळगांवमधील दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

भीषण अपघातात हळगांवमधील दोघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

googlenewsNext

हळगांव : अहमदनगर - सोलापूर महामार्गावरील मांगी ( ता. करमाळा ) शिवारातील अवघड वळणावर ट्रक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीवर अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात ठार झालेले दोघे जामखेड तालुक्यातील हळगांव येथील रहिवासी होते. कामावरून परतत असताना हा भीषण अपघात झाला. या घटनेने हळगांवसह परिसरावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना काल 3 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास घडली.
जामखेड तालुक्यातील हळगांव गावांतील गबारवस्ती येथील मथुरदास गोरख कापसे, बाबासाहेब रंगनाथ कापसे, कांतीलाल दादासाहेब कापसे हे तिघे तरूण शेतकरी रोजगारासाठी शेजारील करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील जेऊर भागात विहीर बांधकामाच्या कामासाठी गेले होते. काल ३ नोव्हेंबर रोजी जेऊरहून करमाळा मार्गे हळगांवकडे परतत असताना सोलापूर - अहमदनगर मार्गावरील मांगी शिवारात असलेल्या टोलनाक्याच्या पुढील अवघड वळणावर मोटारसायकलला कंटनेरने जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की मोटारसायकलचा अक्षरश : चक्काचूर झाला. या भीषण अपघातात मथुरदास कापसे हा तरूण जागीच ठार झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या बाबासाहेब कापसे व कांतीलाल कापसे या अन्य दोघांना करमाळ्यातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले होते. अहमदनगर येथून हळगांवला आणल्यानंतर बाबासाहेब कापसे यांचे काही वेळातच निधन झाले.
मृतक मथुरदास कापसे व बाबासाहेब कापसे हे दोघे एकाच वस्तीवर राहणारे तरूण होते. अपघातात दोघांचा झालेल्या दुदैर्वी मृत्यूने हळगांव परिसरावर दु : खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या अपघातातील जखमी कांतीलाल दादासाहेब कापसे याच्यावर अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मागील वर्षी ऐन लक्ष्मीपुजनाच्या दिवशी एकाच परिवारातील दोघांचा मृत्यू झाल्याने मागील वषीर्ची दिपावली हळगांवकरांसाठी ' काळी दिवाळी' ठरली होती. आता यंदाही दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हळगांव मधील दोघां तरूणांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळगांव गावांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Two dead in Hargaon accident, one seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.