पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 01:47 PM2019-02-09T13:47:29+5:302019-02-09T14:09:20+5:30

पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन शनिवारी (9 फेब्रुवारी) मागे घेण्यात आले आहे. अर्जुन खोतकरांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

Three Women On Hunger Strike To Press For Farmers' Demands In Maharashtra | पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन मागे

पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन मागे

googlenewsNext
ठळक मुद्देपुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन शनिवारी (9 फेब्रुवारी) मागे घेण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाकडून आंदोलनादरम्यान झालेल्या दडपशाहीच्या प्रकारची चौकशी करणार असल्याची माहिती खोतकर यांनी दिली.आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दोन दिवसांनी 11 फेब्रुवारीपासून अधिक तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मुलींनी दिला आहे. 

अहमदनगर - पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन शनिवारी (9 फेब्रुवारी) मागे घेण्यात आले आहे. पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पोलीस प्रशासनाकडून आंदोलनादरम्यान झालेल्या दडपशाहीच्या प्रकारची चौकशी करणार असल्याची माहिती खोतकर यांनी दिली. तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दोन दिवसांनी 11 फेब्रुवारीपासून अधिक तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मुलींनी दिला आहे. 

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, संपूर्ण कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत, कृषीसंलग्न वस्तुंवरील जीएसटीतून माफी, सुक्ष्मसिंचन, कृषी अवजारांवरांना शंभर टक्के अनुदान, शेतीमालाला हमीभाव, दुधाचे दर वाढून मिळावेत, अशा अनेक मागण्यांसाठी पुणतांब्यातील तीन मुलींनी अन्यत्याग आंदोलन सुरू केलं होतं.  आज या आंदोलनाचा सहावा दिवस होता. शुक्रवारी पालकमंत्री राम शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. मात्र ती निष्फळ ठरली होती.

पुणतांब्यातील आंदोलक मुलींची रुग्णालयात रवानगी; पोलिसांनी बळजबरीनं कारवाई केल्याचा आरोप

पुणतांब्यातील आंदोलनकर्त्या मुलींना रात्री उशिरा पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. यावरुन पुणतांब्यात तणाव निर्माण झाला होता. तसेच पोलिसांनी बळजबरीने ही कारवाई केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गेल्या पाच दिवसांपासून पुणतांब्यातील शेतकरी कन्यांचं विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू होतं. सर्व मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा इशारा या मुलींनी दिला होता. 

अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शुभांगी जाधव या मुलीला अस्वस्थ वाटू लागल्यानं तिला रात्री अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर पोलिसांनी तिच्या सोबत आंदोलन करत असलेल्या मुलींचीही रुग्णालयात रवानगी केली होती. मुलींची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र पोलिसांनी बळजबरीनं कारवाई केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. रात्री दीड वाजता पोलिसांनी आंदोलनकर्त्या मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल केलं. यावेळी काही ग्रामस्थांनादेखील ताब्यात घेण्यात आलं. यामुळे पुणतांब्यात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

Web Title: Three Women On Hunger Strike To Press For Farmers' Demands In Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.