विहिरीतून पाण्याची चोरी : नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:14 PM2018-11-24T12:14:54+5:302018-11-24T12:14:57+5:30

नेवासा तालुक्यातील देडगाव शिवारात गेल्या एक वर्षापासून विहीरीतून विनापरवाना पंचवीस हजार रूपयांचे पाच लाख लिटर पाणी चोरीस गेल्याची फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

Theft of water from the well: Nevasa police filed the complaint | विहिरीतून पाण्याची चोरी : नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विहिरीतून पाण्याची चोरी : नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

googlenewsNext

नेवासा : नेवासा तालुक्यातील देडगाव शिवारात गेल्या एक वर्षापासून विहीरीतून विनापरवाना पंचवीस हजार रूपयांचे पाच लाख लिटर पाणी चोरीस गेल्याची फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
दिनेश हस्तीमल गुगळे (वय-५७ रा. चितळे रोड, अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्याद दाखल केली आहे. देडगाव व पाचुंदा शिवारात गुगळे यांची जमीन आहे. त्यांच्या शेतात पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर, बोअर घेतलेले आहे. तरी देखील पाणी कमी पडू लागल्याने त्यांनी पाचुंदा शिवारात गंगाझर कोकरे यांची ३ वर्षांपुर्वी अर्धा एकर जमीन घेवून तेथे विहीर खोदली. उन्हाळ्यात जेव्हा पाणी कमी पडते, त्यावेळी या विहीरीच्या पाण्याचा वापर करत असतो. काल (ता. २२) रोजी सकाळी दहा वाजता पाचुंदे गावच्या शिवारातील विहीरीवरून पाणी आणण्यासाठी गेलो असताना त्या विहीरीत कोणी तरी अज्ञात व्यक्तीने इलेक्ट्रीक मोटार टाकून चोरीच्या उद्देशाने बेकायदेशीर माझ्या मालकीची विज वापरून पाणी चोरी करत असल्याचे आढळून आले. परिसरात चौकशी केली असताना गंगाधर कोकरे, पोपट कोकरे व आणखी एक अशा तिघांनी पाण्याची चोरी करत असल्याचे समजले. त्या बाबत त्यांच्याकडे विचारणा केली असताना त्यांनी आम्हीच तुझ्या विहीरीचे पाणी वापरतो, तुला काय करायचे ते करून घे, पुन्हा आला तर तुझे काही खरे नाही असा दम दिला. त्यांनी एक वर्षात २५ हजार रूपयाचे ५ लाख लिटर पाणी चोरले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक बबन तमनर हे करत आहेत.

 

Web Title: Theft of water from the well: Nevasa police filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.