कोपरगावचा तरूण फसला, सरकारी कामांच्या ठेक्यांसाठी तब्बल दीड कोटी रुपये गमावून बसला!

By सचिन धर्मापुरीकर | Published: January 23, 2024 05:12 PM2024-01-23T17:12:00+5:302024-01-23T17:12:28+5:30

मालेगाव येथील भरत उदयसिंग परदेशी याचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून भावेश रामचंद्र थोरात (वय ३५) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे.

The young man of Kopargaon was cheated, lost as much as one and a half crore rupees for government work contracts | कोपरगावचा तरूण फसला, सरकारी कामांच्या ठेक्यांसाठी तब्बल दीड कोटी रुपये गमावून बसला!

कोपरगावचा तरूण फसला, सरकारी कामांच्या ठेक्यांसाठी तब्बल दीड कोटी रुपये गमावून बसला!

कोपरगाव (जि. अहमदनगर) : कोपरगाव शहरातील तरुणास विविध सरकारी कामांचा ठेका देतो म्हणून १ कोटी ४० लाख रूपयांना फसविल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात न्यायालयीन आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव येथील भरत उदयसिंग परदेशी याचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून भावेश रामचंद्र थोरात (वय ३५) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे.

भरत परदेशी हा मालेगाव येथील रहिवासी असून व फिर्यादी भावेश थोरात कोपरगाव शहरातील कर्मवीरनगर येथील रहिवासी आहे. त्यांची मित्रांच्या मार्फत ओळख झाली. त्यातून परदेशी याने बड्या नेत्यांसोबत उठबस आहे, मी तुझा फायदा करून देऊ शकतो असे सांगितले. त्यास बळी पडून भावेश थोरात याने पुणे येथील हवेली येथे एल. अँड. टी. कंपनीचे नळ बसविण्याचा ठेका देतो या नावाखाली त्याकडून दि. २३ एप्रिल २०१९ रुपये ०१ लाख, २६ एप्रिल ०१ लाख,०५ मे रोजी ०१ लाख, १३ मे रोजी ३० हजार, ०७ जून ०१ लाख, २८ जून रोजी ५० हजार, २० जुलै रोजी ०१ लाख, २३ जुलै रोजी ०१ लाख,०३ ऑगष्ट रोजी ०२ लाख, २४ ऑगष्ट रोजी ०२ लाख, २४ ऑगष्ट रोजी ०२ लाख, १० सप्टेंबर रोजी ०२ लाख, ३० ऑक्टोबर रोजी दोनदा ०२ लाख बँकेतून,१५ सप्टेंबर रोजी १.५० लाख, असे सन-१०१९ साली एकूण २२ लाख ४५ हजार रुपये लुबाडले होते.

त्या नंतर आरोपीने, ०८ दिवसात दुसरे काम सुरु करतो व तुझे पैसे काढून देतो असे म्हणून विशाखापट्टणम येथे घेऊन गेला व सरकारी इमारतीस रंग देण्याचे काम देतो असे सांगुन ०८ लाख रुपयांना घेतले. एवढे कमी की काय त्याने पुन्हा एकदा, सोलरचे काम मिळवून देतो, म्हणून केंद्रीय मंत्र्यांकडे नेऊन व केबिन बाहेर बसवून ३० लाख रूपये खात्यात जमा करण्यास सांगितले होते. ती रक्कमही थोरात यांनी जमा केली. त्यानंतरही कुठलेही काम दिले नाही. पाठपुरावा करून त्याने सहा महिन्यानंतर १७ लाख रुपयांची मागणी केली होती. दि.०६ नोव्हेंबर २०२० रोजी एक करार करून दिला होता. त्यास बळी पडून फिर्यादीने पुन्हा एकदा आरोपीच्या खात्यावर १७ लाख रुपये वर्ग केले होते. त्या पोटी बनावट शिक्के व कागदपत्र वापरून फसवणूक केली आहे.

दरम्यान त्यानंतर पुन्हा एकदा सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आला असून त्या रेशन कार्ड प्रोजेक्टचे काम देतो असे सांगून आणखी एकदा ४० लाख रुपये जमा करायला लावले होते. त्यानंतर काम दिले नाही. दरम्यान पुन्हा एकदा फास टाकून त्याने फिर्यादिस करारनामा करून दिला व राज्यात महामार्गावर पोल बसवून त्यावर सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवून द्यायचे आहे. असा नवा बनाव तयार केला व त्या बाबत २ कोटी ८६ लाख ८५ हजार ८०० रुपयांचे कॅमेरे, पोल, नाटबोल्ट असे साहित्य दिले होते. व तसा करारनामा करून दिला होता. त्या बदल्यात परदेशी याने फिर्यादी कडून पुन्हा एकदा ५० लाख रुपयांचा गंडा घातला होता.

१ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्यानंतर थोरात यांनी कोपरगाव येथील न्यायालयात दावा दखल करून तो कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. दरम्यान या प्रकरणी फिर्यादी भावेश थोरात याने आरोपी भरत परदेशी याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 

Web Title: The young man of Kopargaon was cheated, lost as much as one and a half crore rupees for government work contracts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.