टँकर चालकाने उडवल्या दहा गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 02:23 AM2018-12-23T02:23:00+5:302018-12-23T02:23:23+5:30

एका टँकरचालकाने बोलेगाव फाटा येथून ते प्रेमदान चौकापर्यंत आठ ते दहा गाड्यांना उडविले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

tanker hits ten vehicles | टँकर चालकाने उडवल्या दहा गाड्या

टँकर चालकाने उडवल्या दहा गाड्या

Next

अहमदनगर - एका टँकरचालकाने बोलेगाव फाटा येथून ते प्रेमदान चौकापर्यंत आठ ते दहा गाड्यांना उडविले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री पावणे अकरा ते अकरा च्या दरम्यान हा थरार घडला. सुसाट सुटलेल्या टँकरचालकांना तोफखाना पोलिसांनी प्रेमदान चौकात अडवून ताब्यात घेतले. हे कृत्य त्याने कोणत्या कारणामुळे केले याची चौकशी पोलिस करत आहेत.

बोलेगाव फाट्यापासून सुसाट वेगाने निघालेल्या टँकरचालकाने तेथे तीन ते चार वाहनांना धडक दिली त्यानंतर संजोग हॉटेल येथे एका मोटर सायकल स्वराला   धडक दिली. मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. ही घटना एग्रीकल्चर महाविद्यालयातील गौरव देवडे,संकेत सोणवणे, दीपक माने यांनी पहिली. यावेळी त्यांनी तात्काळ    तोफखाना पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी टॅंकर चालकाला ताब्यात घेतले

Web Title: tanker hits ten vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.