काळे कारखान्याचा मद्यनिर्मिती परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 07:34 PM2017-09-19T19:34:18+5:302017-09-19T19:35:08+5:30

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या देशी मद्य प्रकल्पावर छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या तपासणीत दोन साठवण टाक्या विनापरवाना उभारल्याचे उघडकीस आले. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारखाना व्यवस्थापनास नोटीस बजावून म्हणणे मांडण्यास सांगितले. मात्र समर्पक उत्तर न मिळाल्याने कारखान्याचा मद्यनिर्मितीचा परवाना रविवारी एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला. त्यामुळे मद्यनिर्मिती पूर्णत: बंद झाली आहे. 

Suspended black liquor licenses | काळे कारखान्याचा मद्यनिर्मिती परवाना निलंबित

काळे कारखान्याचा मद्यनिर्मिती परवाना निलंबित

Next
ठळक मुद्देउत्पादन शुल्कची कारवाईदोन साठवण टाक्या विनापरवाना

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या देशी मद्य प्रकल्पावर छापा टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या तपासणीत दोन साठवण टाक्या विनापरवाना उभारल्याचे उघडकीस आले. यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारखाना व्यवस्थापनास नोटीस बजावून म्हणणे मांडण्यास सांगितले. मात्र समर्पक उत्तर न मिळाल्याने कारखान्याचा मद्यनिर्मितीचा परवाना रविवारी एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला. त्यामुळे मद्यनिर्मिती पूर्णत: बंद झाली आहे. 
काळे कारखान्याच्या मद्यनिर्मितीत अनियमितता आढळल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी केली. यावेळी चार लाख लिटर क्षमतेच्या साठवण टाकीत साडेचार लाख लिटर साठा आढळून आला. क्षमतेपेक्षा ५० हजार लिटर अधिक स्पिरिट  सापडले. तसेच विनापरवाना दोन साठवण टाक्या उभारल्याचे समोर आले. या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारखाना व्यवस्थापनास नोटीस बजावून म्हणणे मांडण्यास सांगितले. मात्र समर्पक उत्तर न मिळाल्याने कारखान्याचा मद्यनिर्मितीचा परवाना रविवारी एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला. त्यामुळे मद्यनिर्मिती पूर्णत: बंद झाली आहे. 
या कारवाईबाबत काळे म्हणाले, कारखान्याच्या मद्याला प्रचंड मागणी आहे. गेल्या हंगामात मद्यप्रकल्प १०९ दिवस चालला. मागील वर्षी ६० लाख २३ हजार बॉक्सची विक्री झाली. पण, विक्रीची किंमत वाढविता न आल्याने उत्पन्न थोड्याफार प्रमाणात कमी झाले. आसवनी व देशी मद्यविभाग शाश्वत करून उत्पन्न वाढविण्याचा विचार आहे. नवीन ३६ कोटींच्या मद्यप्रकल्पाच्या उभारणीचे काम सध्या चालू आहे. वर्षभरात हा प्रकल्प ३२० दिवस चालेल. त्यातून ८ कोटींची बचत होईल. प्रकल्पाची वाफ साखर कारखान्यास जाणार असल्याने मोठी बचत होणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले. 
................................................
महाराष्टÑात क्रमांक दोनवर खप असलेल्या देशीमद्य प्रकल्पाचा व्यवसाय वाढत असल्याने हितशत्रूंना देखवत नाही. पण, आपला कारभार चोख व स्वच्छ असून कोणतीही अनियमितता नाही. त्यामुळे आलेल्या संकटातून लवकरच बाहेर पडू.
- आशुतोष काळे, अध्यक्ष, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना.

Web Title: Suspended black liquor licenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.