मनाची मलिनता घालविण्यासाठी सूर्योपासना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 06:59 AM2019-01-28T06:59:12+5:302019-01-28T07:01:36+5:30

मनामध्ये नाना प्रकारचे विचार येतात. वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश मनात येऊन मन अस्थिर होते.

Suryopasana to get rid of the mind | मनाची मलिनता घालविण्यासाठी सूर्योपासना

मनाची मलिनता घालविण्यासाठी सूर्योपासना

Next

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
मनामध्ये नाना प्रकारचे विचार येतात. वेगवेगळ्या प्रकारचे क्लेश मनात येऊन मन अस्थिर होते. तेव्हा त्या मनाला स्थिर करून दु:खमुक्त करायचे असेल तर प्रात:काली उठून मनाने सूर्यस्नान करावे. शुभ चिंतन करावे. सूर्यस्नान केल्यास मन प्रसन्न होण्यास मदत होते. सूर्याच्या कोवळ्या उन्हात १० मिनिटे तरी निर्विकार मन करून बसावे. शुभ कल्पना कराव्यात. अरुणोदयाची लाली पाहून सूर्य आगमनाची प्रतीक्षा करावी. सूर्यस्नान, सूर्यनमस्कार मनाला ताजेतवाणे करतात. सूर्याची तेजस्वी किरणे अंगावर येतात तेव्हा चैतन्याच्या लहरी मनात शिरतात. पहाटेची अमृतवलयं आणि त्यात सूर्याची किरणं यांनी मन प्रफुल्लित होत असते. म्हणूनच प्रभू रामचंद्रांपासून अनेकांनी सूर्योपासना केली आहे. मनाची देवता चंद्र आहे,
तर सूर्याची देवता बुद्धी. मन आणि बुद्धी ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. मन, बुद्धी आणि आत्मा या त्रिवेणीचा खेळ शरीरावर परिणाम करतो, म्हणून मनाला सुंदर विचार करण्याची सवय लावा. ती शक्ती बुद्धीकडून मिळते. बुद्धीला शक्ती आत्मा देते आणि आत्मा परमात्मा बनण्यासाठी मनाची स्थिती महत्त्वाची असते. मनाची मलिनता घालविण्यासाठी सूर्योपासना करावी. सूर्याची तेजोमयी किरणे मनाचे प्रतिबिंब बदलवतात. त्या किरणांनी मनाची गती बदलते. त्यानुसार त्यातील दूरदृष्टी ठरते. ‘मन’ ही देवता प्रसन्न ठेवायची असेल तर श्रद्धायुक्त अंत:करणाने सूर्यस्नान करा. पूर्वकालपासून ऋषिमुनी-देवी, देवता यांनी सूर्याची स्तुती केली आहे. पांडवांना ‘अक्षयपात्र’ सूर्याने दिले होते. सूर्याची शक्ती मनाला आरोग्य प्रदान करून देते. वेदकालापासून त्याची उपासना केली जाते. मनुष्य जीवनात सूर्य आरोग्य व चंद्र संपत्ती देत असतो. मंगलाचरण करण्यासाठी कायिक, वाचिक, मानसिक ताप घालविण्यासाठी सूर्यसंध्या करा. मनाला चांगले संस्कार देण्यासाठी सूर्योपासना करणे हाही महत्त्वाचा भाग आहे. प्रवृती-निवृत्ती मिश्रित भावना ठेवण्यासाठी, मनुष्याच्या इच्छापूर्तीसाठी सूर्याचे अनुष्ठान करा. सद्गुणांनी युक्त होऊन शुद्ध भावांनी ‘ॐ सूर्याय नम:’ म्हणून १२ वेळा जप करा. आपल्या मनोवृत्तीत बदल होईल. दुष्ट प्रवृत्तीपासून दूर जाऊन मनात सद्भाव तयार होईल. मन उत्तमोत्तम विचार करील.

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

Web Title: Suryopasana to get rid of the mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.