यंदा महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन दुपटीने वाढले; पुणे, कोल्हापूर विभाग आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 07:35 PM2018-01-10T19:35:33+5:302018-01-10T19:39:38+5:30

७ जानेवारीअखेर राज्यात झालेल्या गाळप व साखर उत्पादनापेक्षा यावर्षी याच तारखेला दुप्पट गाळप व उत्पादन झाले आहे. ७ जानेवारी २०१७ रोजी राज्यात २४०.५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. यावर्षी ४४०.४७ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.

Sugar production in Maharashtra doubled this year; Pune, Kolhapur are in the forefront | यंदा महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन दुपटीने वाढले; पुणे, कोल्हापूर विभाग आघाडीवर

यंदा महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन दुपटीने वाढले; पुणे, कोल्हापूर विभाग आघाडीवर

Next
ठळक मुद्दे​​​​​​​गेल्यावर्षी ७ जानेवारीअखेर राज्यात झालेल्या गाळप व साखर उत्पादनापेक्षा यावर्षी याच तारखेला दुप्पट गाळप व उत्पादन झाले आहे. सन २०१६-१७ च्या हंगामात ७ जानेवारी २०१७ रोजी राज्यात २२८.२३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले होते. त्यातून २४०.५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते.यावर्षी ४२५.०१ लाख मेट्रिक टन ऊस गाळपातून ४४०.४७ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.७ जानेवारीअखेर प्राप्त आकडेवारीनुसार राज्यात ८७ सहकारी व ६२ खाजगी असे १४९ साखर कारखाने सुरू आहेत.

मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर : साखर हंगाम सुरू होऊन सव्वा दोन महिने झाले असताना राज्यात १४९ साखर कारखान्यांच्या माध्यमातून जवळपास साडेचार कोटी क्विंटल साखर तयार झाली आहे. साखर उता-यात कोल्हापूर विभागाने आपली आघाडी कायम राखताना अव्वल स्थान पटकाविले आहे. तर कधीकाळी राज्यात दबदबा असणा-या अहमदनगर विभागाची थेट चौथ्या स्थानावर घसरण कायम आहे.
गेल्यावर्षी ७ जानेवारीअखेर राज्यात झालेल्या गाळप व साखर उत्पादनापेक्षा यावर्षी याच तारखेला दुप्पट गाळप व उत्पादन झाले आहे. सन २०१६-१७ च्या हंगामात ७ जानेवारी २०१७ रोजी राज्यात २२८.२३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले होते. त्यातून २४०.५८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. याच तारखेला यावर्षी ४२५.०१ लाख मेट्रिक टन ऊस गाळपातून ४४०.४७ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.
रविवार ७ जानेवारीअखेर प्राप्त आकडेवारीनुसार राज्यात ८७ सहकारी व ६२ खाजगी असे १४९ साखर कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांनी ७ जानेवारीअखेर ४२५.०१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ४४०.४७ लाख क्विंटल साखर तयार करण्यात आली आहे. जवळपास चार कोटी क्विंटलच्या पुढे राज्यातील साखर उत्पादनाने झेप घेतली आहे. बुधवारपर्यंत हे उत्पादन जवळपास साडेचार कोटी क्विंटलपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३६ टक्के आहे. यात ३७ कारखाने असणारा कोल्हापूर विभाग ११.६२ टक्के उता-यासह राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला. तर राज्यात सर्वाधिक ६१ कारखाने असणारा पुणे विभाग १०.४० उता-यासह दुस-या क्रमांकावर आहे.

विभागनिहाय गाळप साखर उत्पादन

(गाळप मेट्रिक टनामध्ये व उत्पादन क्विंटलमध्ये) पुढीलप्रमाणे :- कोल्हापूर: १०१.४६ लाख (११७.८५ लाख). पुणे १६६.८८ लाख (१७३.५७). अहमदनगर ५९.८९ लाख (५८.५८ लाख). औरंगाबाद ३७.९९ लाख (३३.०७ लाख). नांदेड ५२.८७ लाख (५१.७३ लाख). अमरावती ३.१४ लाख (३.१४ लाख). नागपूर २.७९ लाख (२.५३ लाख).

राज्याचा विभागनिहाय साखर उतारा

कोल्हापूर ११.६२, पुणे १०.४०, अमरावती १०.०२, अहमदनगर ९.७८, नांदेड ९.७८, अमरावती १०.०२, नागपूर १०.३६.

Web Title: Sugar production in Maharashtra doubled this year; Pune, Kolhapur are in the forefront

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.