केडगावमधील पथदिव्यांची बत्ती ‘गुल’! नगर-केडगाव मार्ग अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 06:08 PM2018-05-31T18:08:04+5:302018-05-31T18:08:04+5:30

सुमारे चार कोटींचा कर भरूनही केडगावकरांच्या वाट्याला अंधार आला आहे.केडगाव उपनगरातील विविध वसाहतीत असणारे दिव्यांचे खांब बंद पडून महिने लोटले तरी त्याकडे कोणी पाहण्यास तयार नाही.नगर-केडगाव मार्गावरील निम्म्याहून अधिक पथदिवे बंद पडले आहेत.अंधारामुळे अपघाताची भीती वाढली आहे.

The street lights in Kedgoga are 'Gul'! Nagar-Kedgaon route in the dark | केडगावमधील पथदिव्यांची बत्ती ‘गुल’! नगर-केडगाव मार्ग अंधारात

केडगावमधील पथदिव्यांची बत्ती ‘गुल’! नगर-केडगाव मार्ग अंधारात

Next

योगेश गुंड
केडगाव : सुमारे चार कोटींचा कर भरूनही केडगावकरांच्या वाट्याला अंधार आला आहे.केडगाव उपनगरातील विविध वसाहतीत असणारे दिव्यांचे खांब बंद पडून महिने लोटले तरी त्याकडे कोणी पाहण्यास तयार नाही.नगर-केडगाव मार्गावरील निम्म्याहून अधिक पथदिवे बंद पडले आहेत.अंधारामुळे अपघाताची भीती वाढली आहे.
सुमारे ८० हजारापेक्षा जास्त लोकवस्ती असणा?्या केडगाव मधून महापालिकेला वषार्ला सुमारे ४ कोटी रुपयांचा कर रूपाने महसूल मिळतो.रखडलेल्या मुलभूत सुविधा योजनेतील कामांशिवाय गेल्या चार-पाच वर्षात केडगाव भागात कोणतेच नाव घेण्याजोगे काम उभे राहू शकले नाही.केडगाव मधील विविध वसाहतीमधील पथदिव्यांची संख्या जवळपास ३ हजारांच्या घरात आहे,मात्र यातील २ हजार दिवे हि सुरु नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत..गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले दिवे सुरु करण्याकडे कोणीच लक्ष दिले नसल्याने अनेक ठिकाणी अंधारातच नागरिक चाचपडत आहेत.आता पावसाळा सुरु होणार असल्याने अंधारात रस्त्यावरील डबके,खड्डे यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
नगर-पुणे राज्यमार्गावर केडगाव पर्यंत रस्ता दुभाजकावर दिव्यांचे खांब लावण्यात आले.मोठ्या थाटामाटात त्याचे उद्घाटन करण्यात आले.मात्र एक-एक करत निम्मे दिवे बंद पडले तरी ते पुन्हा सुरु करण्याकडे महापालिकने लक्ष दिले नाही.रात्रीच्या वेळी राज्यमार्गावर अंधार होत असल्याने अनेक अपघात घडत आहेत.रेल्वे उड्डाणपूल तर नेहमीच अंधारात असतो.अनेक खांबाना वाहनांनी धडक दिल्याने ते रस्तावर वाकडे पडले अआहेत.नागरिकांनाच ते सरळ करावे लागत आहेत.

साहित्यच नाही आम्ही तरी काय करू
केडगाव मधील बंद पथदिव्यांची तक्रार करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना .आम्ही अनेकदा मनपाकडे साहित्य मागतो,पण साहित्यच मिळत नाही मग आम्ही दिवे तरी कसे सुरु करणार, असे उत्तर कर्मचार्यांकडून ऐकावे लागते. मनपाकडे साहित्य नसल्याने केडगाव मधील नागरिक अंधारात चाचपडत आहेत.हे साहित्य कधी येईल आणि कधी केडगावचा अंधार दूर होईल असा प्रश्न नागरिक करत आहेत.

‘भाग्योदय’चे खासगीकरण व्हावे
वषार्ला लाखो रुपयांचा महसूल मिळवून देणारे केडगाव मधील भाग्योदय मंगल कार्यालय मनपाला केडगाव ग्रामपंचायतीकडून आयते मिळाले.मात्र त्याचे नूतनीकरण तर सोडाच पण साधी डागडुजी करण्याची तसदी हि मनपाने कधीच घेतली नाही.मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षाने सुस्थितीत असणारे हे कार्यालय अडगळीत पडले आहे.त्याचे खासगीकरण व्हावे तरच या कार्यालयाचे खरे ह्यभाग्य ह्य उजळेल अशी मागणी नागरिक करत आहेत.

 

Web Title: The street lights in Kedgoga are 'Gul'! Nagar-Kedgaon route in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.