चोरलेल्या संगणक संचासह सहा आरोपी गजाआड

By admin | Published: September 30, 2014 01:00 AM2014-09-30T01:00:31+5:302014-09-30T01:29:30+5:30

अहमदनगर : १८ संगणक संच,गॅस टाक्या,बॅटऱ्या, प्रोजेक्टर, आॅईलचे डबे आदी आठ लाख रुपयांच्या साहित्यासह सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री अटक केली

Six accused, along with a stolen computer set, | चोरलेल्या संगणक संचासह सहा आरोपी गजाआड

चोरलेल्या संगणक संचासह सहा आरोपी गजाआड

Next


अहमदनगर : १८ संगणक संच,गॅस टाक्या,बॅटऱ्या, प्रोजेक्टर, आॅईलचे डबे आदी आठ लाख रुपयांच्या साहित्यासह सहा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री अटक केली. साहित्य विकत घेणाऱ्यालाही अटक करण्यात आले आहे.
याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांना सांगितले की, स्थानिक गुन्हे शाखेचे काही पोलीस कर्मचारी गस्तीवर असताना अरणगाव रोडवर एका मोटारसायकलवर एका पोत्यात भरलेले सामान घेऊन तिघेजण चालले होते. त्यांच्याविषयी संशय निर्माण झाल्याने त्यांच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली. त्यांचा पाठलाग करीत पोलिसांनी अरणगाव येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेच्या आवारात तिघांना ताब्यात घेतले. शिवतेज शिवाजी जावळे (वय २०), अशोक अंबादास भडके (वय २३), दिलीप गिताराम दहातोंडे (सर्व रा. चांदा, ता. नेवासा) अशी त्यांची नावे होती. त्यांच्या पोत्यामध्ये संगणक संच, पितळी समई, अ‍ॅप्लीफायर, आॅईलच्या बाटल्या असे साहित्य आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी संगणक आणि इर्न्व्हटर शाळेतून चोरून आणल्याची कबुली दिली. त्यांनी त्यांच्या या कामात मदत करणाऱ्या तिघांची नावे सांगितली. सतीश सुरेश पुंड, शरद दत्तात्रय मेहेत्रे (रा. सोनई) अशी नावे सांगितली. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. चोरलेला माल या पाच जणांनी अशोक सोन्याबापू वावरे (रा. नागापूर) याला विकला. या प्रकरणी वावरे यालाही अटक करण्यात आली आहे.
चोरट्यांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी नगर तालुका, सोनई, पाथर्डी, राहुरी, एम.आय.डी.सी., वैजापूर, गंगापूर (जि. औरंगाबाद)आदी परिसरात चोऱ्या केल्याचे सांगितले. चोरट्यांकडून आठ लाख रुपये किमतीचे १८ संगणक संच, लाकूड कापण्याचे मशिन, अ‍ॅप्लीफायर इनव्हर्टर, गॅस टाक्या, बॅटरी, समई, घंटा, प्रोजेक्टर आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, संजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुकर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, ज्ञानदेव गव्हाणे, सचिन गोलवड यांच्या पथकाने कारवाई केली.(प्रतिनिधी)

Web Title: Six accused, along with a stolen computer set,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.