शिर्डीत ब्रॅण्डेड चप्पलचोर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:32 AM2018-08-31T11:32:28+5:302018-08-31T11:32:31+5:30

साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या महागड्या चप्पल, बूट चोरून संस्थानच्या लॉकरमध्ये दडवून ठेवणाऱ्या भामट्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ७५ ब्रॅन्डेड चप्पल, बूट हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांची किंमत एक लाखाहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Shirdi branded slippers detained | शिर्डीत ब्रॅण्डेड चप्पलचोर अटकेत

शिर्डीत ब्रॅण्डेड चप्पलचोर अटकेत

Next

शिर्डी : साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या महागड्या चप्पल, बूट चोरून संस्थानच्या लॉकरमध्ये दडवून ठेवणाऱ्या भामट्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे ७५ ब्रॅन्डेड चप्पल, बूट हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांची किंमत एक लाखाहून अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गणेश वारूडकर असे या पंचेचाळीस वर्षीय भामट्याचे नाव आहे. तो अमरावती जिल्ह्यातील धामणगाव, रेल्वे येथील रहिवासी आहे. तो येथून चोरलेले बूट गावी विकत होता. २१ तारखेपासून तो संस्थानच्या साई उद्यान भक्त निवासात लॉकर घेऊन राहात होता. आरतीच्या वेळी भाविक मंदिरात बराच वेळ जातात. ती संधी साधून तो ब्रॅन्डेड चप्पल, बूट चोरून लॉकरमध्ये नेऊन ठेवत असे. बुधवारी दुपारच्या आरतीच्यावेळी त्याने नेहमीप्रमाणे चप्पल, बूट चोरले.  त्याचवेळी चप्पलाचा मालक असलेल्या दोन महिला आरतीतून बाहेर पडल्या.  त्यांनी या चोरट्याला चप्पल चोरताना पाहिले. त्यांनी त्याचा पाठलाग केला. तो साई उद्यानमध्ये गेल्यावर महिलांनी सुरक्षारक्षकांना सांगितले. सुरक्षारक्षकांनी त्याला हटकताच तो पळून गेला.
संस्थानचे सुरक्षा प्रमुख पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे तत्काळ घटनास्थळी गेले. त्यांनी तेथील रूम व लॉकरचे रेकॉर्ड तपासले असता या आरोपीच्या १४४ क्रमांकाच्या लॉकरमध्ये ६० चप्पल व १५ बूटाचे जोड आढळले. लॉकर घेताना आरोपीने आधार कार्ड व मोबाईल नंबर दिला होता. त्यानुसार मोबाईल लोकेशन व आधार कार्डवरील फोटोच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला. रात्री आठ वाजता संस्थान प्रसादालयात तो आढळून आला. त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पाकीटमारीबरोबरच भाविकांच्या चप्पल व बूट चोरीला जाण्याचे मोठे प्रमाण आहे. त्यात काही टोळ्याही सक्रिय असल्याची चर्चा आहे. यात लाखोंची उलाढाल होते. गेल्या पंधरा दिवसापूर्वी चेन्नईच्या एका महिला भाविकाचे बूट चोरीला गेल्याने तिने पोलिसात तक्रार दिली होती. तसेच संस्थानकडून सीसीटिव्ही फुटेजही मिळवले होत, मात्र याबाबत कोणीही गंभीरपणे घेतले नव्हते.

Web Title: Shirdi branded slippers detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.