कालवेप्रश्नी अडवाआडवीची भूमिका योग्य नाही : राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:28 PM2019-01-22T12:28:15+5:302019-01-22T12:28:49+5:30

राज्यकर्त्यांची आडमुठेपणाची भूमिका आता सर्वसामान्य जनता खपवू घ्यायला तयार नाही

The role of Kalve questionnaire is not correct: Ram Shinde | कालवेप्रश्नी अडवाआडवीची भूमिका योग्य नाही : राम शिंदे

कालवेप्रश्नी अडवाआडवीची भूमिका योग्य नाही : राम शिंदे

googlenewsNext

तळेगाव दिघे : राज्यकर्त्यांची आडमुठेपणाची भूमिका आता सर्वसामान्य जनता खपवू घ्यायला तयार नाही. अशा परिस्थितीत कोणत्याही शासनाच्या कामात काही अडचण असेल, तर बसून प्रश्न मिटला पाहिजे. निळवंडेचा प्रश्न आपण कायम उचलून धरला आहे. सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. निळवंडे कालवेप्रश्नी अडवाआडवीची भूमिका आताच्या कालखंडात योग्य नाही, असे प्रतिपादन राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे रविवारीशेतकरी ग्रामस्थांच्या बैठकीत पालकमंत्री प्रा. शिंदे बोलत होते. भाजपाचे नेते राम राजू, तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, डॉ. अशोक इथापे, विनायक गुंजाळ, राजाभाऊ कांदळकर, गोविंद कांदळकर, भगवान सानप, नामदेव दिघे, पुंजाहरी दिघे, पाटीलभाऊ दिघे, सरपंच लता गायकवाड, वाळीबा सानप, संजय सानप, मच्छिंद्र सानप, नामदेव सानप, संतोष सानप, दिनकर गायकवाड, सीताराम सानप, भीमराज उगलमुगले, ज्ञानेश्वर सानप, रखमा कांदळकर, मधुकर सानप, रामनाथ सानप, तहसीलदार साहेबराव सोनवणे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे उपस्थित होते.
तिगाव ग्रामस्थांनी गावाच्या एकोप्यातून मंदिर बांधले. श्रद्धेतून अशी कामे होतात. अवर्षणप्रवण क्षेत्रातील असलेला हा भाग सातत्याने दुष्काळाच्या संघर्षाला तोंड देतोय. निळवंडे व भोजपूर धरणाचे पाणी केंव्हा ना केंव्हा येईल, या प्रतीक्षेत हा भाग आहे. निळवंडे अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा होती. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारने साईबाबा संस्थानकडून निधी उपलब्ध करून दिला.आता काम होणे बाकी आहे. सातत्याने आपण असे आडवे पडत राहिलात तर लोक सुद्धा तुम्हाला कधी ना कधी आडवे केल्याशिवाय राहणार नाही.
समाजकारण व राजकारणामध्ये काम करीत असताना अशा पद्धतीने काम अडविणे बरोबर नाही. आपल्या गावामध्ये लाईट यायची असली तरी त्यासाठी कुणाच्या शेतात खांब टाकल्याशिवाय वीज येत नाही. पाटाने पाणी यायचे असेल तर वरच्या भागातील लोकांनी जमीन उपलब्ध करून दिल्याशिवाय खालच्या भागातील लोकांना पाणी येत नाही. पाणी वरून काढायचे असेल, तर दंड वरून काढावा लागतो, खालून काढता येत नाही. पालकमंत्री या नात्याने निळवंडे कालव्यांच्या प्रश्नात लक्ष घालीन, असेही ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री शिंदे यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार केला. सूत्रसंचालन शरद उगलमुगले यांनी केले.

Web Title: The role of Kalve questionnaire is not correct: Ram Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.