‘लोकमत एस्पायर’ला प्रतिसाद

By Admin | Published: May 30, 2014 11:22 PM2014-05-30T23:22:14+5:302014-05-31T00:23:40+5:30

अहमदनगर : शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात अगे्रसर असणार्‍या ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन प्रायोजित ‘लोकमत एस्पायर’ शैक्षणिक प्रदर्शन २०१४

Respond to 'Lokmat Aspire' | ‘लोकमत एस्पायर’ला प्रतिसाद

‘लोकमत एस्पायर’ला प्रतिसाद

googlenewsNext

अहमदनगर : शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात अगे्रसर असणार्‍या ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन प्रायोजित ‘लोकमत एस्पायर’ शैक्षणिक प्रदर्शन २०१४ ला पहिल्या दिवशी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सावेडी रस्त्यावरील गायकवाड सांस्कृतिक भवन या ठिकाणी सुरू असलेल्या शैक्षणिक प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी हजारो पालक आणि विद्यार्थ्यांनी भेट देत आपल्या भावी शैक्षणिक वाटचालीची दिशा निश्चित करण्याचा प्रयत्न केला. लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने या प्रदर्शनात नगर आणि पुणे जिल्ह्यात नामवंत शिक्षण संस्थांनी प्रगत अभ्यासक्रमाचे ३३ स्टॉल लावले आहेत. एलसीडीसह माहिती पुस्तिका आणि विषयतज्ज्ञ शिक्षक नगरकरांना शैक्षणिक सुविधांची माहिती देताना दिसत होते. प्रत्येक स्टॉलवर जाऊन नगरकरांनी शिक्षण संस्था, त्यांचा अभ्यास, शैक्षणिक सुविधांची माहिती घेतली़ प्रदर्शनाला भेट देणार्‍यांची आणि माहिती घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या नोंदी ठेवण्यात शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी व्यस्त होते. (प्रतिनिधी) सहभागी व्यावसायिक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, विळदघाट. श्री छत्रपती शिवाजी महाराज इंजि. कॉलेज, अ.नगर. ढोले पाटील ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटस्, पुणे. सूर्यदत्ता ग्रूप आॅफ इन्स्टिट्यूट, पुणे. संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटस्, कोपरगाव. न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, अ.नगर. एम.के.सी.एल., अ.नगर. सृजन अ‍ॅनिमेशन, पुणे. ४एन.आय.बी.आर., पुणे. प्रवरा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस, डीम्ड युनिव्हर्सिटी, लोणी. अरिहंत ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट, पुणे. न्यू लॉ कॉलेज, पुणे. मुळा एज्युकेशन सोसायटी, सोनई (यश ग्रुप). श्री. विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट, श्रीशिवाजीनगर, राहुरी. विश्वभारती अ‍ॅकॅडमी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग. एम.आय.टी. विश्वशांती गुरूकुल कॉलेज, पुणे. आयकॉन इ-लर्निंग सॉफ्टवेअर. व्ही.आय.टी., पुणे. बी.पी.एच.ई. सोसायटी अहमदनगर कॉलेज, अ.नगर. कृषी तंत्रनिकेतन, वाळुंज. महाराष्टÑ स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, अ.नगर. श्री. समर्थ पॉलिटेक्निक, म्हसणे फाटा, पारनेर. अग्रवाल क्लासेस, पुणे. सह्याद्री व्हॅली कॉलेज आॅफ इंजि. अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी. मल्टीमीडिया अ‍ॅनिमेशन अ‍ॅण्ड डिझायनिंग कॉलेज, अ.नगर-सॉफ्टटेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट. आकर्षक बक्षिसे प्रदर्शनस्थळी भेट देणार्‍या प्रत्येक भाग्यवान विजेत्याला दर तासाला दररोज लकी ड्रॉद्वारे चांदीचे नाणे, मोबाईल जिंकण्याची संधी मिळणार आहे़ शुक्रवारचे विजेते अमोल हरेल, नजीर काझी, आर्या शिदोरे, नितीन कदम भाग्यवान विजेत्यांनी शुक्रवारी लकी ड्रॉद्वारे बक्षिस जिंकण्याचा मान मिळविला आहे़ आजचे सेमिनार दि़ ३१ मे २०१४ वेळ- ४ ते ५ इन्स्टिट्युट- एमआयटी पुणे, विश्वशांती गुरुकूल सीबीएसई स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वाखरी, पंढरपूऱ मार्गदर्शक : शिवप्रसाद, कल्याण कृष्णा, राकेश रंजन विषय : १० वीनंतरचे करिअर विषयी मार्गदर्शन वेळ - सायंकाळी ५ ते ६ इन्स्टिट्युट : पद्मश्री डॉ़ विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, विळद घाट, अ़नगऱ मार्गदर्शक : डॉ़ अरुण इंगळे विषय : प्रोफेशनल पर्सनल डेव्हलपमेंट या ठिकाणी एकाच छताखाली मेडिकल, एमबीए, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चरपासून फॅशन, ग्राफिक्स, इंटिरियर डिझाइनपर्यंत व रिटेल, आय.टी. एव्हिएशनपासून मीडिया,अ‍ॅनिमेशन, गेमिंग, डीएड्, आयुर्वेदिक कॉलेज, लॉ कॉलेज, कृषी तंत्रज्ञान या सर्वच दर्जेदार क्षेत्रात आपले नाव झळकवू इच्छिणार्‍यांसाठी लोकमतने संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या शैक्षणिक प्रदर्शनात जिल्ह्याबाहेरील विविध संस्थांचे १५ स्टॉल आहेत. या ठिकाणी सिंहगड इन्स्टिट्यूट, डॉ. विखे पाटील फाऊंडेशन, संजीवनी गु्रप आॅफ इन्स्टिट्यूट, विश्वभारती, सृजन एनिमेशन, यश गु्रप, विश्वशांती गुरूकुल, एमकेसीएल, महाराष्ट्र तंत्र मंडळ, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, अग्रवाल क्लासेस, विश्वभारती अ‍ॅकेडमी, प्रवरा मेडिकल कॉलेज यांच्यासह अन्य संस्था सहभागी झाल्या. शंभर टक्के शिष्यवृत्ती शुक्रवारी दुपारी सृजन अ‍ॅनिमेशनच्यावतीने अ‍ॅनिमेशनमध्ये करिअरवर समुपदेशन करण्यात आले. पहिल्यांदाच सृजनच्यावतीने पुण्याबाहेर खास ‘लोकमत’च्या आग्रहाखातर नगरमध्ये अ‍ॅनिमेशनमध्ये करिअर करणार्‍यांसाठी शंभर टक्के शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संतोष रासकर यांनी दिली. त्यानंतर पद्मश्री डॉ. विखे पाटील फाऊंडेशनचे मार्गदर्शक डॉ. अरूण इंगळे यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाची माहिती दिली. प्रदर्शनात उद्घाटनानंतर दुपारी पालक- विद्यार्थी, नागरिकांची गर्दी होती. सायंकाळीही उत्तरोत्तर गर्दी वाढत गेली. प्रदर्शनाचे दोन दिवस बाकी आहेत. अ‍ॅनिमेशन चांगला पर्याय अ‍ॅनिमेशनचा उपयोग प्रत्येक उद्योगामध्ये होत आहे़ अ‍ॅनिमेशन डिझाईनमध्ये ग्राफिक्स, मल्टिमिडिया, वेब डिझायनिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेम डिझायनिंग यासारख्या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत़ भारतात सहज उपलब्ध होऊ शकणारे मनुष्यबळ आणि अ‍ॅनिमेशनसाठी येणारा कमी खर्च यामुळे भारत अ‍ॅनिमेशनचा केंद्र बनला आहे़ त्यामुळे येथील अ‍ॅनिमेशनच्या विद्यार्थ्यांना मोठ्या संधी आहेत़ -संतोष रासकर, सृजन संस्था, पुणे

Web Title: Respond to 'Lokmat Aspire'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.