Pulwama Terror Attack: एकदा होऊन जाऊ द्या आरपार : अण्णा हजारे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 10:28 PM2019-02-15T22:28:59+5:302019-02-15T22:29:12+5:30

पुलवामातील जवानांवरील हा अत्यंत भ्याड हल्ला आहे.

Pulwama Terror Attack: take action on terrorist: Anna Hazare | Pulwama Terror Attack: एकदा होऊन जाऊ द्या आरपार : अण्णा हजारे

Pulwama Terror Attack: एकदा होऊन जाऊ द्या आरपार : अण्णा हजारे

googlenewsNext

अहमदनगर : पुलवामातील जवानांवरील हा अत्यंत भ्याड हल्ला आहे. या हल्ल्याने संपूर्ण देशाला वेदना झाल्या आहेत. आणखी किती दिवस जवान शहीद होणार? एकदा होऊ द्या आरपार! यांना धडा शिकवलाच पाहिजे. यावर सरकारने विचार करावे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत व्यक्त केले.

अण्णा हजारे म्हणाले, एकदा होऊ द्या आरपार! अशी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचीच भावना आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्वांच्याच भावनांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. वयोमानानुसार मला आज शस्त्र पेलवणार नाही. पण जर माझी गरज पडलीच तर देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना सामुग्री पुरवण्याचे काम आजही करीन, अशी प्रतिक्रिया खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.

Web Title: Pulwama Terror Attack: take action on terrorist: Anna Hazare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.