राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलं शनिशिंगणापूरच्या श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 02:11 PM2023-11-30T14:11:14+5:302023-11-30T14:11:41+5:30

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस देखील होते उपस्थित

President Draupadi Murmu visited Shanishinganapur's Shri Shanaishwar Murti | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलं शनिशिंगणापूरच्या श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलं शनिशिंगणापूरच्या श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन

सुहास पठाडे, शिंगणापूर (जिल्हा अहमदनगर): महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पुजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

राष्ट्रपतींचे श्री शनैश्वर मंदिरात आगमन झाल्यावर त्यांनी शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेतले व उदासी महाराज मठात त्यांनी अभिषेकही केला. अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला. श्री शनिशिंगणापूर संस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदळे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. श्री शनैश्वर मंदीर दर्शन झाल्यानंतर  प्रसादालयात  राष्ट्रपतींनी प्रसादाचे सेवनही केले.

 

Web Title: President Draupadi Murmu visited Shanishinganapur's Shri Shanaishwar Murti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.