प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार

By admin | Published: July 27, 2014 11:22 PM2014-07-27T23:22:35+5:302014-07-28T00:52:06+5:30

अहमदनगर : आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

Prepare the draft for preventive action | प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार

प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार

Next

अहमदनगर : आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. गुन्हेगारांना हद्दपार करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. याशिवाय अवैध धंदे,कायदा-सुव्यवस्थेला हानी पोहचविणाऱ्या सर्व घटकांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी दिली.
आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये नगर जिल्ह्याने चांगले सहकार्य केले आहे. सर्व प्रक्रिया शांततेत पार पडल्या आहेत. त्यामुळे येणारी निवडणूकही शांततेत पार पडेल. त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सर्वच समाज घटक, शासकीय यंत्रणा, माध्यमांच्या सहकार्यामुळेच निवडणुका शांततेत पार पडल्या. यापुढेही त्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. आदर्श आचारसंहिता ही नेहमीच पाळायची असते. लोकांनी सोशल मीडियाला संयमाने हाताळण्याची गरज आहे. एखादा आक्षेपार्ह मजकूर वाचण्यात आला, तर आधी स्वत:चा मोबाईल फोडायला हवा आहे, पण तसे कुठे घडते का? लोकांची डोकी फोडली जातात, हे घातक आहे. समाजातील वाईट प्रवृत्तींना ठेचण्याचे काम पोलीस करतील. गुन्हेगारांबाबत बारकाईने आराखडा तयार करण्यात येत असून त्याला लवकरच अंतिम स्वरुप दिले जाईल. शांतता बिघडविण्याची संधी कोणालाही दिली जाणार नाही. मोक्कांतर्गत कारवाईचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्याचीही लवकरच अंमलबजावणी होईल. गुन्ह्यांच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करेल, यावरच भर देण्यात आला आहे. वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगला म्हणण्याची प्रवृत्ती ठेवली तर शांतता नांदेल. यासाठी सहकार्याची गरज आहे, असे शिंदे म्हणाले. (प्रतिनिधी)
तीनशे पोलिसांची प्रतीक्षा
नगर जिल्ह्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या २७० पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मात्र हे पोलीस बळ अद्याप जिल्ह्यासाठी मिळालेले नाही. सण,उत्सव, निवडणुका होईपर्यंत हे पोलीस बळ नगर जिल्ह्यासाठी उपलब्ध होण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे आहे त्या पोलिसांवरील ताण वाढणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झालेले पोलीस जिल्ह्यासाठी मिळावेत, यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत,असेही पोलीस अधीक्षक शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Prepare the draft for preventive action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.