पाथर्डीच्या हसतखेळत शिक्षणाला विदेशातही पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:26 AM2021-08-21T04:26:13+5:302021-08-21T04:26:13+5:30

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील वायकरवस्ती हसतखेळत शिक्षणाला विदेशातही पसंती मिळत आहे. तेथील मुलांना मातृभाषेच्या शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी हा ...

Pathardi's humorous education is also preferred abroad | पाथर्डीच्या हसतखेळत शिक्षणाला विदेशातही पसंती

पाथर्डीच्या हसतखेळत शिक्षणाला विदेशातही पसंती

Next

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील वायकरवस्ती हसतखेळत शिक्षणाला विदेशातही पसंती मिळत आहे. तेथील मुलांना मातृभाषेच्या शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी हा उपक्रमाचा फायदा होत आहे.

शैक्षणिक साहित्यनिर्मितीद्वारे हसतखेळत शिक्षण देण्याचा हायटेक उपक्रम वायकरवस्ती (ता. पाथर्डी) या शाळेतील शिक्षक पोपट फुंदे यांनी दीड वर्षांपासून राबविला आहे. रांजणी प्राथमिक शाळेवर शिक्षिका असणाऱ्या अनुराधा फुंदे या त्यांच्या पत्नीही फुंदे यांना याकामी मदत करीत आहेत. कोरोना महामारीत गृहभेटीमध्ये ज्यांनी अद्याप शाळेची पायरीही चढली नाही, अशा पहिली, दुसरीच्या निरागस बालकांसाठी तर हा अभिनव उपक्रम शैक्षणिक जिव्हाळा निर्माण करणारा ठरला आहे. शैक्षणिक साहित्यनिर्मिती अन् बौद्धिक क्षमतेनुसार त्यांचा वापर अशा दुहेरी कृतीने मुले स्वयंअध्ययनावर अधिक भर देत आहेत. व्हाॅट्सॲप, फेसबुकच्या माध्यमातून अमेरिका, केनियातील विदेशी भारतीय नागरिकांनाही ही माहिती मिळाली. त्यामुळे त्यांच्या मुलांनाही मातृभाषा शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी विदेशातही शैक्षणिक साहित्यनिर्मितीद्वारे हसतखेळत शिक्षणाची मागणी होत आहे. असे शैक्षणिक साहित्य नुकतेच अमेरिकेतील मिशिगन शहरातील (मूळ गाव सोनई) अभिजित होशिंग यांना कुरिअरने पाठविले आहे.

२९ जून रोजी कुरिअरने साहित्य घरी पोहोचताच पिता अभिजित व अभिधा, सिया या त्यांच्या दोन्ही मुलींनीही आनंद व्यक्त केला. हात्राळ, पाडळी शिवारातील अंजली धायदार, तेजस भागवत, दुर्गा भागवत, विद्या वायकर आदींच्या वस्तीवर शिक्षक पोपट फुंदे समवेत गुरुवारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने भेट दिली. कोरोनामुळे मुलांनी अद्यापही शाळेची पायरी चढली नाही. मात्र, आमची दुसरीतील मुले चौथीच्या वर्गाच्या अभ्यासाचे अवलोकन करीत असल्याचे पालक बबन धायदार, सारिका धायदार या दाम्पत्याने सांगितले.

---

गणित, इंग्रजी, मराठी विषयांचे विविध साहित्य टाकाऊ वस्तूंपासून बनविले जाते. काना, मात्रा, उकार, वेलांटीच्या बाराखडीसह चौदाखडीची उपकरणे बनविली आहेत. सुट्ट्या स्वरूपात अक्षरे आहेत. खेळणीसारखे वाटतात. त्यामुळे मुले रमतात. मराठी भाषेचे आकलन यामुळे सहज सोपे वाटत आहे.

-पोपट फुंदे,

शिक्षक

Web Title: Pathardi's humorous education is also preferred abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.