कांदा दीड वर्षातील उच्चांकावर; १६०० रुपये क्विंटल भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 04:29 PM2017-07-27T16:29:22+5:302017-07-27T16:41:33+5:30

कांद्याला चक्क १६ रुपये किलोचा भाव मिळाला आणि गेली दीड वर्ष सातत्याने डोळ्यातून आसवे गाळणाºया शेतकºयाच्या चेहºयावर हसू फुलले़

onion,price,hike, | कांदा दीड वर्षातील उच्चांकावर; १६०० रुपये क्विंटल भाव

कांदा दीड वर्षातील उच्चांकावर; १६०० रुपये क्विंटल भाव

Next
ठळक मुद्देकांद्याला मिळालेला भाव (प्रतिक्विंटलमध्ये) चांगला कांदा - १६०० रुपये मध्यम कांदा - १४०० रुपये गोलटी कांदा - ११५० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : एक रुपया किलोपर्यंत ढासळलेल्या कांद्याला गुरुवारी गेल्या दीड वर्षातील उच्चांकी भाव मिळाला़ नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात गुरुवारी झालेल्या लिलावात चांगल्या प्रतिच्या कांद्याला सर्वाधिक १६ रुपये किलोचा भाव मिळाला़ हा गेल्या दीड वर्षातील सर्वाधिक भाव ठरला़
गेल्या दीड वर्षात कांद्याचे भाव सातत्याने घरंगळत होते़ कांदा विक्रीतून गाडी खर्चही भागत नसल्यामुळे कांदा उत्पादकांचे डोळे सतत ओले होत होते़ पण गुरुवारी नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात चांगल्या कांद्याला चक्क १६ रुपये किलोचा भाव मिळाला आणि गेली दीड वर्ष सातत्याने डोळ्यातून आसवे गाळणाºया शेतकºयाच्या चेहºयावर हसू फुलले़
मागील वर्षी नगर तालुक्यात परतीचा पाउस चांगला झाला़ त्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. मात्र गेल्या दीड वर्षांपासून कांद्याचे भाव सतत गडगडत होते़ त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटीकुटीला आला होता. कांद्याने शेतकºयांचे सारे आर्थिक गणिते बिघडवल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला. मागील आठवड्यात कांद्याला ३०० ते ९०० रुपये इतका भाव मिळाला होता़ गुरुवारी बाजार समितीत ४० हजार कांदा गोन्याची आवक झाली. कांद्याचे दराने उसळी मारत थेट १६०० रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा पार केला.

इतर राज्यांतून मागणी वाढली
महाराष्ट्राच्या आसपासच्या राज्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली. यामुळे राज्यातील कांद्याची मागणी घटली. त्याचा परिणाम बाजार भावावर झाला. मात्र सध्या या राज्यातील स्थानिक कांदा संपल्याने राज्यातील कांद्याला पुन्हा मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने कांद्याचे भावही वाढले आहेत. हे भाव दोन महिने टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत़

Web Title: onion,price,hike,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.