सरकारच्या कामकाजावर पूर्णत: समाधानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 03:20 PM2017-11-12T15:20:08+5:302017-11-12T15:20:15+5:30

निलम गो-हे: सेनेतून जे बाहेर गेले ते एकटे पडले

Not satisfied with the functioning of the government | सरकारच्या कामकाजावर पूर्णत: समाधानी नाही

सरकारच्या कामकाजावर पूर्णत: समाधानी नाही

Next

अहमदनगर : विविध प्रश्नांमुळे राज्यातील सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे़ नोटाबंदीचा मूळ उद्देश सफल झालेला नाही़ महागाई वाढत आहे़ त्यामुळे सरकारच्या कामकाजाबाबत शिवसेना पूर्णत: समाधानी नाही़ असे मत शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ़ निलम गो-हे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले़
गो-हे म्हणाल्या राज्यात १९९५ साली सेना-भाजपाचे सरकार होते़ आज मात्र परिस्थती तशी नाही़. निवडणुकीत सेना-भाजपा स्वतंत्र लढले़ सरकारमध्ये सहभागी असलो तरी जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी ठाम भूमिका घेतली जाते़ सेना सरकारमधून बाहेर पडली तर शिवसेनेचे आमदार फुटतील असा राजकीय संभ्रम विरोधकांकडून निर्माण केला जात आहे़ सेनेतून बाहेर गेलेले पुन्हा सेनेत आले़ ते बाहेर राहिले ते एकटे पडले़ असे सांगत गो-हे म्हणाल्या गेल्या गेल्या १७ वर्षांत नगर जिल्ह्यात कोठेवाडी ते कोपर्डी या प्रकारणाच्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना  घडल्या आहेत़ अशा घटनांनंतर आरोपी पकडले जातात़ त्यांच्या शिक्षा होते़ मात्र आरोपीला वरिष्ठ न्यायालयात जाण्याची संधी असल्याने त्यामुळे शिक्षेला विलंब होतो़ त्यामुळे अशा अत्याचाराच्या घटनांसाठी जलदगती न्यायालयाची निर्मिती करणे गरजेचे असून, याबाबत विधानपरिषदेत आवाज उठविणार आहे़ शासकीय सेवे कार्यरत असलेल्या महिलांबाबत अत्याचार अथवा हिंसक घटना घडली़ तर त्यांना शासकीय सुविधा देणे गरजेचे असून, याबाबतही पाठपुरावा करणार आहे़ बालन्यायालयात मुलांना भितीदायक वातावरण निर्माण होऊ नये यासाठी तेथील अंतर्गत रचना बदलणे गरजेचे आहे़ राज्यात २०१४ पूर्वी गुन्हेगारी घटनांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाणे अवघे साडेतीनटक्के होते़ सध्या मात्र हे प्रमाण ५७ टक्के आहे़ पोलीसांनी संवेदनशीलपणे काम केले तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल़ पीडित महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून नयेत़ असे आव्हान गो-हे यांनी केले़

 ‘त्या’ बालिकेसाठी विशेष
 सरकारी वकिलाची मागणी करणार
नगर येथील रेल्वेस्टेशनवर अडिच वर्षाच्या बालिकेवर अत्याचाराची घटना घडली होती़ याबबात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे़ हा खटला प्रभावीपणे लढवून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष सरकारी वकिल देण्याची मागणी करणार आहे़ तसेच नगर येथे कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज तातडीने पूर्ण करण्यात यावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेगो-हे यांनी सांगितले़

Web Title: Not satisfied with the functioning of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.