नितीन आगे खून प्रकरण : राहुरीत आरपीआयचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 05:32 PM2017-12-21T17:32:07+5:302017-12-21T17:32:35+5:30

नितीन आगे खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी राहुरी येथील नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर गुरूवारी दुपारी आरपीआयच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Nitin further murder case: Stop the path of RPI in the house | नितीन आगे खून प्रकरण : राहुरीत आरपीआयचा रास्ता रोको

नितीन आगे खून प्रकरण : राहुरीत आरपीआयचा रास्ता रोको

Next

राहुरी : नितीन आगे खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी राहुरी येथील नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर गुरूवारी दुपारी आरपीआयच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांसमोर बोलताना आरपीआयचे राज्य सचिव अशोक गायकवाड म्हणाले, खटल्याची फेरसुनावणी झाली पाहिजे. गुन्ह्याबाबत दबाव असल्याने जिल्ह्याबाहेरील न्यायालयात कामकाज झाले पाहिजे. जनतेच्या भावना तीव्र असून न्याय मिळाला पाहिजे.
प्रास्तविकात सरेंद्र थोरात यांनी दलितांवर होणारे अन्याय थांबले पाहिजे, अशी मागणी केली. एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही. खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्याची मागणी ढवळे यांनी केली. यावेळी सुनिल शिरसाट, सुभाष त्रिभुवन, बाळासाहेब जाधव, अनिल जाधव, विलास साळवे, राजुभाऊ कांबळे यांची भाषणे झाली़ याप्रसंगी राजु आगे, किरण दाभाडे, अशोक केदारे, संजय कांबळे, सागर भिंगारदिवे, अंतोन शेळके, किशोर पंडीत, संजय संसारे, कुंदन आरोळे, कमल संसारे, अनिता म्हस्के, नगरसेविका सुनिता थोरात आदी उपस्थित होते.

Web Title: Nitin further murder case: Stop the path of RPI in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.