नीता अंबानी साईदरबारी

By admin | Published: May 25, 2014 11:58 PM2014-05-25T23:58:31+5:302014-05-26T00:23:56+5:30

शिर्डी : ‘शिरडीस ज्याचे लागतील पाय, टळतील अपाय सर्व त्याचे’ या साईवचनावर श्रद्धा ठेवत प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी मुंबई इंडियन्सच्या यशासाठी

Nita Ambani Saidebari | नीता अंबानी साईदरबारी

नीता अंबानी साईदरबारी

Next

शिर्डी : ‘शिरडीस ज्याचे लागतील पाय, टळतील अपाय सर्व त्याचे’ या साईवचनावर श्रद्धा ठेवत प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी मुंबई इंडियन्सच्या यशासाठी वारंवार साईदरबारी येत आहेत़ आजही साईचरणी माथा टेकवून मुंबई इंडियन्सच्या यशासाठी त्यांनी बाबांना साकडे घातले़ विशेष म्हणजे गेल्या तीन दिवसांपूर्वीही त्यांनी साईदरबारी हजेरी लावली होती़ आयपीएल सामने सुरु झाल्यापासून महिनाभरात त्यांनी तीन वेळा शिर्डी वारी केली़ यंदाच्या आयपीएलमध्ये अंबानी यांची मुंबई इंडियन्स ही टीम खेळत आहे़ या टीमच्या कामगिरीचा आलेख उंचावत असून रविवारी (दि़२५) सायंकाळी मुंबईत मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्समध्ये महत्वाची लढत होती़ या पार्श्वभूमीवर साईभक्त असलेल्या नीता अंबानी यांनी आपला मुलगा हरीअनंत याच्यासह रविवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास साईमंदिरात दर्शन घेतले़ हरीअनंत अंबानी हे कालपासून शिर्डीत होते़ काल सायंकाळी त्यांनी साईदर्शन घेऊन पाच लाखांची देणगी दिली होती़ याशिवाय गेल्या तीन दिवसांपूर्वी २२ मे रोजी नीता अंबानी यांनी मुलगा व नातेवाईकांसह साईदरबारी हजेरी लावली होती़ विशेष म्हणजे गेल्या ३० एप्रिल रोजीही अंबानी शिर्डीत येऊन साईचरणी नतमस्तक झाल्या होत्या़ त्या दिवशी दुबईत मुंबई इंडियन्स व सन रायजर्स हैद्राबाद यांच्यात सामना खेळला जाणार होता़

Web Title: Nita Ambani Saidebari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.