नगर मनपा निवडणूक २०१८ : मतदार यादीत २० तारखेपर्यंत दुरुस्ती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:51 AM2018-11-17T10:51:08+5:302018-11-17T10:51:13+5:30

एखाद्या मतदाराचा पत्ता एका प्रभागात असेल आणि त्याचे नाव दुसऱ्या प्रभागात गेले असेल तर अशा मतदारांबाबत बदल करता येतो

Municipal Municipal Elections 2018: Voters list can be repaired by 20 dates | नगर मनपा निवडणूक २०१८ : मतदार यादीत २० तारखेपर्यंत दुरुस्ती शक्य

नगर मनपा निवडणूक २०१८ : मतदार यादीत २० तारखेपर्यंत दुरुस्ती शक्य

Next

अहमदनगर : एखाद्या मतदाराचा पत्ता एका प्रभागात असेल आणि त्याचे नाव दुसऱ्या प्रभागात गेले असेल तर अशा मतदारांबाबत बदल करता येतो. अशी दुरुस्ती किंवा बदल महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत करता येतो, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगातर्फे माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आयोगाचे प्रसिद्धी अधिकारी जगदीश मोरे, महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार, डॉ. प्रदीप पठारे, प्रसिद्धी अधिकारी मिलिंद वैद्य उपस्थित होते.
या कार्यशाळेत बोलताना चन्ने म्हणाले, विधानसभेची यादी विभाजन करूनच प्रभागनिहाय यादी तयार करण्यात येते. विधानसभा यादीमध्येच मतदाराचे नाव नसेल तर ते महापालिकेच्या प्रभाग यादीत येणे शक्य नाही. विधानसभेच्या यादीत नाव असेल आणि महापालिकेसाठी कोणत्याही प्रभागाच्या यादीत नाव नसेल तर असे नाव अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदार यादीत समाविष्ट करता येईल. पत्ता ज्या प्रभागात आहे, त्या प्रभागातील यादीत नाव नसेल, तर अशाही नावांमध्ये बदल करता येतो.
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अफवा पसरविल्या जातात. प्रत्यक्षात मात्र मशिन्स्ना मोठ्या प्रमाणावर सुरक्षा असते. मशिनमध्ये उमेदवारांची नावे समाविष्ट करताना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमक्ष सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाते. मतदानाची टक्केवारी वाढविण्याबाबत आयोग जागृती करणार आहे.
नागरिकांच्या आयुष्यावर परिणाम करणारी स्थानिक स्वराज्य संस्था ही सर्वात जवळची संस्था आहे, त्यामुळे अशा संस्थेच्या निवडणुकीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केले पाहिजे. लोकसभा, विधानसभा आणि नगरसेवक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी सारखेच कागदपत्रे लागतात, असे काही नाही, असे चन्ने यांनी स्पष्ट केले.
आॅनलाईन अर्जांची कटकट
सध्या आॅनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी सात ते आठ तास वेळ द्यावा लागत आहे. प्रत्यक्ष अर्ज सादर करायचे असताना आॅनलाईन अर्जांची अट उमेदवारांना किचकट वाटत आहे, या माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नावर चन्ने म्हणाले, आॅनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे राज्य निवडणूक आयोगाकडे उमेद्वारांचा डाटा एकत्रित उपलब्ध होतो. असा डाटा सन २००० पूर्वी यंत्रणेअभावी करणे शक्य नव्हते. असा डाटा आयोगाकडे ठेवण्यासाठीच आॅनलाईन अर्जांची अट घालण्यात आली आहे. मात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. परवानगी घेऊनच उमेदवारांनी प्रचार करावा. प्रचारासाठी सार्वजनिक जागा आधी मागेल त्यालाच प्राधान्यक्रमानुसार परवानगी दिली जाईल, असे चन्ने म्हणाले

जाहिरात प्रकाशितबाबत समान नियम प्रस्तावित लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला अगदी मतदानाच्या दिवशीही वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करता येते. मात्र महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ४८ तास आधीच प्रचार संपतो. प्रचार संपल्याच्या मुदतीनंतर उमेदवाराला वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देता येत नाही. त्यामुळे सर्वच निवडणुकीसाठी प्रचाराची मुदत आणि जाहिरात प्रसिद्धीबाबत समान नियम करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे चन्ना यांनी सांगितले.

Web Title: Municipal Municipal Elections 2018: Voters list can be repaired by 20 dates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.