ठळक मुद्देमटक्यावर कारवाई करणाºया पोलिसांविरोधात पत्रकबाजी

अहमदनगर : एमआयडीसी परिसरातील चेतना कॉलनी, सह्याद्री चौक परिसरात सुरू असलेल्या मटका रॅकेटचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे़ शुक्रवारी रात्री एकाच वेळी चार ठिकाणी छापे टाकून दोन बुकींसह चार जणांना ताब्यात घेत ३८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह त्यांच्या पथकाने ही कारवाई करत जितेंद्र पाटोळे व निलेश म्हसे या बुकींना ताब्यात घेतले़ म्हसे हा मावळा संघटनेचा अध्यक्ष आहे़ पाटोळे व म्हसे यांच्या सांगण्यानुसार मटका चालविणारे भाऊसाहेब रामचंद्र वरूटे (रा़ वडगाव गुप्ता), कय्युम अकबर सय्यद, अजमुद्दीन गुलाब सय्यद, महेंद्र शिवराम कदम (रा़ गजानन कॉलनी, नवनागापूर) यांनाही अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
चेतना कॉलनी येथे राहणारा जितेंद्र पाटोळे यांच्या घरातच मटक्याचे सेंटर होते़ इतर ठिकाणी चालविण्यात येणाºया मटक्यातून जमा होणारी रक्कम या सेंटरवर आणली जात होती़ पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़ यावेळी पोलिसांनी पाटोळे याच्याकडे विचारपूस केली असता त्याने निलेश म्हसे हा पार्टनर असल्याचे सांगत त्याचे कारनामे उघड केले़

मटक्यावर कारवाई करणाºया
पोलिसांविरोधात पत्रकबाजी
निलेश म्हसे हा मावळा संघटनेचा अध्यक्ष आहे़ त्याच्या मटका अड्ड्यांवर कुणी पोलीस कर्मचाºयांनी कारवाई केली तर संघटनेच्या लेटरपॅडवर त्या पोलीस कर्मचाºयाची वरिष्ठ पोलीस अधिकाºयाकडे तक्रार करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता़ त्यामुळे त्याचे मटका रॅकेट चांगलेच तेजीत आले होते़ या मटका अड्ड्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना खबºयामार्फत माहिती मिळाली होती़ शर्मा यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी पथकासह थेट मटका अड्ड्यांवर छापा टाकून बुकींसह त्यांच्या पंटरांवरही कारवाई केली़ कारवाई दरम्यान चव्हाण यांना म्हसे याने फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता़ चव्हाण यांनी मात्र दबावाला बळी न पडता धडक कारवाई केली़


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.