बाजार समिती सक्षमीकरणासाठी उपाययोजना करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:19 AM2021-02-08T04:19:35+5:302021-02-08T04:19:35+5:30

पारनेर : बाजार समिती सक्षमीकरणासाठी आगामी अर्थसंकल्पात उपाययोजना मांडण्यात येतील आणि त्यावर तरतुदी करण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित ...

The market committee will take measures for empowerment | बाजार समिती सक्षमीकरणासाठी उपाययोजना करणार

बाजार समिती सक्षमीकरणासाठी उपाययोजना करणार

Next

पारनेर : बाजार समिती सक्षमीकरणासाठी आगामी अर्थसंकल्पात उपाययोजना मांडण्यात येतील आणि त्यावर तरतुदी करण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी आ. निलेश लंके यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सभापती प्रशांत गायकवाड म्हणाले, केंद्र सरकारच्या नव्या शेतकरी कायद्यामुळे बाजार समितीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे बाजार समितीचे अर्थकारण बिघडून कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते. त्यामुळे शेतकरी, बाजार समिती, कर्मचारी यांना वाचविण्यासाठी राज्य सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पात बाजार समितीसाठी ठोस उपाययोजना राबवून त्यांना सक्षम करण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद द्यावी, अशी मागणी केली.

यावेळी अजित पवार म्हणाले, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीकडून कृषी कायद्याचा अभ्यास होऊन राज्यात हे धोरण कशा पद्धतीने राबवायचे की बंद ठेवायचे, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे बाजार समितीच्या अस्तित्वाला धोका पोहोचू नये यासाठी निर्णय घेण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

---

पवार करणार गायकवाडांबरोबर चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभापती गायकवाड यांच्याकडून कृषीभूषण सबाजीराव गायकवाड यांच्या मिठाच्या शेतीची माहिती घेतली. लवकरच ते गायकवाड फार्म येथे भेट देऊन सबाजीराव गायकवाड यांच्या शेतीतील प्रयोगाची माहिती घेणार असल्याचे समजते.

Web Title: The market committee will take measures for empowerment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.