केडगाव हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 01:46 PM2018-04-08T13:46:02+5:302018-04-08T13:46:02+5:30

शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले आहे

Kanggaon massacre case: MLA Sangram Jagtap court | केडगाव हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप न्यायालयात

केडगाव हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप न्यायालयात

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी केले हजर

अहमदनगर : शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले आहे.ी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास आमदार जगताप यांच्यासह संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर आणि बाळासाहेब एकनाथ कोतकर या चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणातील २२ आरोपींनाही पोलीसांनी न्यायालयात हजर केले आहे. थोड्याच वेळात न्यायालयाचे कामकाज सुरु होणार आहे. केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली होती. याशिवाय या हत्याकांडप्रकरणी आमदार अरुण जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अन्य ३० जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Kanggaon massacre case: MLA Sangram Jagtap court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.