जामखेडमध्ये रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व्यावसायिकाचे सव्वापाच लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 01:09 PM2018-10-29T13:09:23+5:302018-10-29T13:09:53+5:30

वॉईन शॉपचा व्यावसायिक दुकान बंद करून विक्रीची रक्कम घेऊन घरी जात असताना दुचाकी वाहनावरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व्यावसायिकाकडील पाच लाख पंधरा हजाराची रोख रक्कम लुटून नेली.

In Jummhed, the soldier's robbery robbed of millions of robbers | जामखेडमध्ये रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व्यावसायिकाचे सव्वापाच लाख लुटले

जामखेडमध्ये रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व्यावसायिकाचे सव्वापाच लाख लुटले

googlenewsNext

जामखेड : शहरातील वॉईन शॉपचा व्यावसायिक दुकान बंद करून विक्रीची रक्कम घेऊन घरी जात असताना दुचाकी वाहनावरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व्यावसायिकाकडील पाच लाख पंधरा हजाराची रोख रक्कम लुटून नेली. ही घटना रविवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
बलराम बन्सीलाल आहुजा (वय ४०) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री १०.४५ वाजता वॉईन शॉपचे दुकान बंद करून मोटारसायकलवर घरी जात असताना त्यांनी आपली पिशवी गाडीच्या हँडलला अडकवली होती. पिशवीमध्ये पाच लाख पंधरा हजाराची रोख रक्कम होती. तपनेश्वर रस्त्यावरील पंडीत ज्वेलर्स समोर आहुजा पोहोचले असताना पाठीमागून काळ्या रंगाच्या होंडाशाईन मोटारसायकलवरून दोन अनोळखी व्यक्ती आल्या व त्यांनी आहुजा यांना मोटारसायकल आडवी लावली. मागे बसलेल्या व्यक्तीने रिव्हॉल्वर काढून आहुजा यांच्या डोक्याला लावली व पाच लाख पंधरा हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून काही क्षणातच चोरटे पसार झाले. चोरट्यांच्या मोटारसायकलला नंबर प्लेट नव्हती.
घटना घडल्यानंतर व्यावसायिक बलराम आहुजा घाबरून गेले. त्यांनी तात्काळ बंधू कृष्णा आहुजा यांना फोन करून घडलेली घटना सांगितली. कृष्णा आहुजा यांनी पोलिसांना कळवले. तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. व्यावसायिकाला रिव्हॉल्वर डोक्याला लावून लुटण्याच्या या प्रकारामुळे व्यापारी व व्यावसायिकात भितीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: In Jummhed, the soldier's robbery robbed of millions of robbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.