‘इश्कवाला लव्ह’ टीम सोबत थिरकली तरुणाई

By admin | Published: September 21, 2014 11:44 PM2014-09-21T23:44:08+5:302014-09-21T23:49:13+5:30

अहमदनगर : ‘इश्कवाला लव्ह’ टीमशी संवाद साधताना तरुणाईने जल्लोष केला.

'Ishqwala Love' team jumped along with the team | ‘इश्कवाला लव्ह’ टीम सोबत थिरकली तरुणाई

‘इश्कवाला लव्ह’ टीम सोबत थिरकली तरुणाई

Next

अहमदनगर : झपाटलेला २, दुभंग, अनवट या सिनेमांच्या माध्यमातून तरुणांमध्ये जिद्द व चिकाटीचा संदेश देणारा, ‘स्टॅण्डबॉय’ सारख्या हिंदी सिनेमात काम करणाऱ्या आणि ‘इश्कवाला लव्ह’मधून अभिनयाची धमाल सादर करणाऱ्या आदिनाथ कोठारे व त्याच्या ‘इश्कवाला लव्ह’ टीमशी संवाद साधताना तरुणाईने जल्लोष केला. त्यांच्याशी संवाद साधताना निर्माती रेणू देसाई यांनी आपला चित्रपट निर्मितीचा प्रवास उलगडला.
‘इश्कवाला लव्ह’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटाच्या टीमने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज, जी. एच. रायसोनी कॉलेज, विश्वभारती इंजिनिअरिंग कॉलेजला भेट दिली. यामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री सुलग्ना पाणीग्राही, निर्माती व दिग्दर्शक रेणू देसाई, गायिका आनंदी जोशी सहभागी होते. त्याचबरोबर काही भाग्यवान विजेत्यांना चित्रपटाच्या गाण्यांच्या सीडी व आदिनाथबरोबर ‘सेल्फी’ फोटो काढण्याचा आनंद मिळाला.
डॉ. विठ्ठलराव विखे फौंडेशनचे सचिव ले. ज. (रि.) बी. सदानंदा, डायरेक्टर पी. एम. गायकवाड, डेप्युटी डायरेक्टर अभिजीत दिवटे. जी. एच. रायसोनीचे सिद्धांत काळे, प्रशांत मुनफन, विश्वभारती इंजि. कॉलेजचे प्रिंसिपल डॉ. कुरेशी, गडकर यांनी सत्कार केला.
त्यानंतर आदिनाथ कोठारे व रेणू देसाई यांनी चित्रपटाविषयी माहिती दिली.
अकिरा फिल्मस् व श्री आद्य फिल्मस् निर्मित ‘इश्कवाला लव्ह’ संपूर्ण महाराष्ट्रात १० आॅक्टोबर २०१४ ला प्रदर्शित होत आहे. तसेच बहुचर्चित ‘मंगल अष्टक वन्स मोअर’ फेम रेणू देसाई दिग्दर्शनात पदार्पण करत आहे आणि हा चित्रपट महाराष्ट्र आणि नयनरम्य मॉरिशसमध्ये चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे छायाचित्रण बॉलिवूडचे प्रसिद्ध सिनेमोटोग्राफर विनोद प्रधान यांनी केले. त्यांनी याआधी ‘रंग दे बसंती’, ‘देवदास’, ‘भाग मिल्खा भाग’ यासारख्या दिग्गज व मोठ्या चित्रपटांचे छायाचित्रण केले आहे. यामध्ये आदिनाथ कोठारे व प्रख्यात ‘अंबर धारा फेम’ सुलग्ना पाणीग्राही एकमेकांसोबत दिसतील.
या चित्रपटात प्रसिद्ध हिंदी गायक मोहित चौहान यांनी गाणं गायलं आहे. केतकी माटेगावकर, बेला शेंडे, आनंदी जोशी, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, विश्वजीत जोशी यांनी ‘इश्कवाला लव्ह’ संगीतबद्ध केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Ishqwala Love' team jumped along with the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.